शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर येथे वन पर्यटनाला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:16 IST

नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे निफाडच्या चापडगाव शिवारात आहे. या अभयारण्य क्षेत्राचे सीमांकन अजून निश्चित झालेले नाही, तसेच व्यवस्थापन आराखडाही अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे; मात्र येथे वन पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जैवविविधतेला पूरक असा ‘वन पर्यटन आराखडा’ राज्याच्या इको टुरिझम बोर्डाकडून तयार केला जात असल्याचे संकेत मिळाले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.

ठळक मुद्देइको टुरिझम बोर्डाकडून निवड : वन्यजीव विभागाच्या व्यवस्थापन आराखड्याला मिळणार मंजुरी

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे निफाडच्या चापडगाव शिवारात आहे. या अभयारण्य क्षेत्राचे सीमांकन अजून निश्चित झालेले नाही, तसेच व्यवस्थापन आराखडाही अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे; मात्र येथे वन पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जैवविविधतेला पूरक असा ‘वन पर्यटन आराखडा’ राज्याच्या इको टुरिझम बोर्डाकडून तयार केला जात असल्याचे संकेत मिळाले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.नांदूरमधमेश्वर अभयारण्यात सध्या पर्यटकांसाठी उद्याननिर्मिती, पॅगोडे, प्रसाधनगृहे, इको हट, उपाहारगृह, विश्रामगृह, पक्षी निरीक्षण मनोरे, बाल्कनी, हाइड बाल्कनी, नेचर ट्रेलसारख्या सुविधा सध्या उपलब्ध आहेत. अभयारण्याला लागून असलेल्या चापडगाव, मांजरगाव, करंजगावमधील काही स्थानिक तरुणांची गाइड म्हणून नियुक्तीही केली आहे. या सोयी-सुविधांचा दर्जा अधिकाधिक उंचवावा आणि यापेक्षाही चांगल्या भौतिक सुविधांची भर पडावी, यासाठी मंडळाकडून तसे प्रयत्न केले जात आहे. लवकरच त्याचा अहवाल मंडळाकडून वन्यजीव विभागाला प्राप्त होईल, असे सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांनी सांगितले. ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती शासनाच्या वन्यजीव विभागाने गठित केली आहे. सध्या समितीच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार व अभयारण्य क्षेत्रातील विकासकामे येणाऱ्या महसुलातून केली जातात. यावर सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनपाल यांचे नियंत्रण आहे.वीस नव्या दुर्बिणींची खरेदीवन्यजीव विभागाने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात येणाºया पर्यटकांची संख्या लक्षात घेता. यंदा वीस नव्या दुर्बीण खरेदी केल्या आहेत. तसेच पक्षी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणारे स्पॉटिंगस्कोपसारखे आधुनिक साहित्यही परदेशातून मागविले आहे. चार स्पॉटिंगस्कोप लवकरच प्राप्त होणार आहेत. सध्या अभयारण्यात टेलिस्कोप उपलब्ध आहेत.४देशी-विदेशी पक्ष्यांना आकर्षित करणारी ही पाणथळ जागा ‘पक्षितीर्थ’ म्हणून नावलौकिकास आली. निरीक्षणातून या अभयारण्य क्षेत्रात अद्याप २४० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती, २४ प्रकारचे मासे, ४०० वनस्पतींची विविधता नोंदविली आहे. १९८६ साली हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केले गेले.‘त्या’ ५० स्थळांमध्ये नांदूरमधमेश्वरयेथे येणाºया पर्यटकांना अधिक चांगल्या दर्जेदार सोयी-सुविधा मिळाव्यात आणि वन पर्यटन विकसित व्हावे, यासाठी वनविभागाच्या राज्य इको टुरिझम मंडळाने राज्यातील ५० नैसर्गिक पर्यटनस्थळांची निवड केली आहे. यामध्ये नांदूरमधमेश्वरचाही सहभाग आहे. या पर्यटनस्थळांवर अधिका-धिक चांगल्या भौतिक सोयी-सुविधा, साधने उपलब्ध करून देत पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे. नैसर्गिक जैवविविधता आणि वनपर्यटनाची सांगड घातली जाणार आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य