शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह अनुदानासाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:24 IST

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून देण्यात येणाºया अनुदानाची रक्कम गेल्या दीड वर्षापासून प्राप्त न झाल्याने सुमारे ४५० जोडपे प्रतीक्षेत असल्याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत बुधवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकीत त्यावर चर्चा झडली.

ठळक मुद्देसमाजकल्याण समिती : धनंजय मुंडे यांना भेटणार

नाशिक : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून देण्यात येणाºया अनुदानाची रक्कम गेल्या दीड वर्षापासून प्राप्त न झाल्याने सुमारे ४५० जोडपे प्रतीक्षेत असल्याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत बुधवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकीत त्यावर चर्चा झडली. केंद्र सरकारने अनुदानाचा हिस्सा दिला असून, राज्याकडून निम्मा हिस्सा मिळावा, यासाठी राज्याचे समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंतरजातीय विवाह करणाºया योजनेसह खात्याच्या सर्वच योजनांचा आढावा घेण्यात आला. आंतरजातीय विवाह केलेल्या ४५० जोडप्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाला प्राप्त झालेले असून, केंद्र सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिलेले असून, राज्याचा हिस्सा मिळाल्याशिवाय अनुदान वाटप करता येत नसल्याचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्याचा योजनेचा आढावा घेण्यात आला असून, पूर्ण झालेल्या प्रस्तावांचे जिओ टॅगिंग फोटोसह माहिती दहा दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर वृद्ध कलावंतांना मानधन, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीस सदस्य सुरेश कमानकर, कन्हु गायकवाड, भास्कर भगरे, भाऊसाहेब हिरे, अपर्णा खोसकर, ज्योती जाधव, वनिता शिंदे यांच्यासह समाजकल्याणचे अधिकारी उपस्थित होते.राज्य सरकारकडून लवकरात लवकर अनुदान मिळण्यासाठी नव्याने पत्रव्यवहार करण्याचे ठरविण्यात आले. दिव्यांगांना घरकुल योजनेंतर्गत २८६ लाभार्थी, पीठगिरणी १५ लाभार्थी तसेच दिव्यांग जोडप्यांना आर्थिक सहाय्याचे दोन लाभार्थी, कृत्रिम अवयव पुरविण्याचे दोन लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे. २० टक्के सेस अंतर्गत चारचाकी वाहन पुरविण्यासाठी ८९ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे थेट खात्यावर रक्कम देण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :marriageलग्न