शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट

By admin | Updated: October 10, 2015 22:06 IST

दुष्काळ : पिके करपली; डाळींबबागा उखडल्या; जनावरांची उपासमार

पिंपळगाव वाखारी : दुष्काळामुळे परिसरात चाराटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर उपाययोजना म्हणून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या जनावरांची व शेती क्षेत्राची माहिती मागवली होती, परंतु याला महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला असूनही अद्याप कुठलीही कार्यवाही नसल्याने मागवलेली माहिती निव्वळ फार्स ठरण्याची चर्चा पशुपालक व शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.पाण्याअभावी खरिपातील सर्वच पिके करपली आहेत. जनावरांसाठी चाराटंचाईचे भीषण संकट शेतकरीवर्गासमोर उभे राहिले आहे. याबाबत गावस्तरावर चारा छावणी तयार करून जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्रत्येक दुष्काळग्रस्त गावातून शेतकऱ्यांची दुभत्या व खाटे जनावरांची व शेती क्षेत्राची माहिती मागविली होती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आपली माहिती अर्जांद्वारे गाव पातळीवर तलाठ्याकडे दिली; परंतु अद्याप शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही नाही. दिवसेंदिवस चाराटंचाईचे संकट वाढत असून, शासन यंत्रणा मात्र सुस्त आहे. मागवलेले अर्ज हे निव्वळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा पशुपालक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.डाळींब परिसरातील एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाला तेल्यारोगाचे ग्रहण लागले. तेल्याचे आक्रमण रोखताना डाळींब उत्पादकांच्या नाकीनऊ आले. काही शेतकरी त्यापासून बचाव करत थोडेफार उत्पादन घेण्यात यशस्वी झाले होते. परंतु छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना तेल्याचे आक्रमण रोखणे अशक्य झाल्याने खर्च अधिक व उत्पादनशून्य अशी अवस्था झाली. त्यामुळे अनेकांनी डाळींबबागा उखडून टाकल्या आहेत. सध्या परिसरात डाळींबबागांवर तेल्याबरोबर प्लेग रोगाचे आक्रमण झाले असून, तयार फळे गळून पडत आहे. यामुळे फळांचे मोठे नुकसान होत असल्याने डाळींब उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)

डाळिंबावर प्लेगचे सावट

पिंपळगाव वाखारी : परिसरातील डाळींबबागांना तेल्या रोगाच्या आक्रमणाबरोबर आता प्लेग रोगाचेही आक्रमण सहन करावे लागत आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक धास्तावले आहेत. अनेक डाळींब उत्पादकांना त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्चच अधिक करण्याची वेळ आल्याने बहुतेक शेतकरी डाळींब बागांना रामराम करण्याच्या तयारीला लागले आहेत.

रब्बीच्या आशा धूसरपिंपळगाव वाखारी : परिसरात पाण्याअभावी रब्बीच्या आशा मावळल्याने शेतकरीवर्गामध्ये कमालीची अस्वस्था निर्माण झाली आहे. यंदा खरिपाबरोबर रब्बीही हातातून निसटत असल्याने परिसरातील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.पाऊस न पडल्याने परिसरात यंदा भीषण दुष्काळीस्थिती आहे. खरिपाची संपूर्ण पिके करपून वाया गेली आहेत. परतीचा पाऊस समाधानकारक बरसल्यास रब्बी होईल या आशेवर असणार्‍या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे परिसरात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आतापासूनच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. शेतकरीवर्गात खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेल्याने कमालीची अस्वस्था वाढली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.