शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

फुलले कमळ; ‘रुतला काटा’

By admin | Updated: February 25, 2017 01:01 IST

फुलले कमळ; ‘रुतला काटा’

संदीप भालेराव : नाशिकनाशिकरोड विभागातील २३ पैकी १२ जागा जिंकत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा आवाज बुलंद झाला आहे. शिवसेना उमेदवारांचा अगदी काही मतांच्या फरकाने पराभव झाल्याने भाजपाच्या कमळाचा ‘काटा’ अनेकांच्या जिव्हारी रुतला असणार. तसेही भाजपाचे हे यश अनपेक्षितच मानले जात असले तरी सेनेसह अन्य पक्षांना हे सत्य स्विकारावेच लागणार आहे. नाशिकरोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी ३, कॉँग्रेस २, मनसे ४, भाजपा ४, रिपाइं २ आणि अपक्ष १ असे बलाबल होते. नाशिकरोडमध्ये शिवसेनेचाच प्रचाराचा बोलबाला होता, तर भाजपाकडून व्यक्तिगत पातळीवरच प्रचार होत असल्याने भाजपा बॅकफुटवर असल्याचीच चर्चा झाली होती. शिवाय नाराज भाजपा कार्यकर्र्त्यांनी तर ‘भाजपाला मते देऊ नका’ असाच प्रचार चालविला होता. त्यामुळे नाशिकरोडमध्ये शिवसेना मोठा पक्ष ठरेल असे वाटत असताना प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच ठरले.  नाशिकरोड विभागातील सहा प्रभागांत भाजपाने जोरदार मुसंडी मारत २३ पैकी १२ जागांवर विजय मिळविला, तर ११ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. कॉँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं, बसपा तर चर्चेतही आले नाही. भाजपाला मोठे यश मिळाले असले तरी पाच ठिकाणी भाजपाचा विजय निसटता झाला आणि भाजपाचे कमळ फुलले. अवघ्या काही मतांच्या फरकाने भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याने त्याची सल मात्र शिवसेनेला असणार आहे.  प्रभाग १८ मध्ये भाजपाचे शरद मोरे, मीरा हांडगे आणि विशाल संगमनेरे विजयी झाले असले तरी दोन ठिकाणी शिवसेना तर अन्य एका ठिकाणी अपक्ष उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झाले. शिवसेना बंडखोर सुनील बोराडे यांना शिवसेनेचे अशोक सातभाई यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली त्यामुळे सेना आणि स्वत: सातभाई यांना हा पराभव जास्त जिव्हारी लागणारा आहे. पक्षाने बोराडे आणि सातभाई यांच्यात समेट घडविला असता तर चित्र वेगळे असते. तीच बाब अपक्ष पवन पवारच्या बाबतीत आहे. पवार अवघ्या ७१३ मतांनी पराभूत झाले. या ठिकाणी भाजपाचा निसटता विजय उमेदवाराला कायम बोचत राहणार आहे.  प्रभाग २१ मध्ये भाजपाच्या कोमल मेहरोलिया आणि सरोज अहिरे या विजयी झाल्या, मात्र हा चमत्कार घडलाच कसा अशीच प्रतिक्रिया परिसरात उमटून गेली. शिवसेनेच्या तनुजा घोलप या अवघ्या ३०३ मतांनी, तर माजी महापौर राहिलेल्या नयना घोलप या देखील २३७ इतक्याच मतांनी पराभूत झाल्या. घोलप यांच्या उंबऱ्यावर येऊन त्यांच्या दोन्ही कन्यांचा केलेला पराभव घोलप कधीच विसरणार नाहीत. आता घोलप यांना मतदारांनी धडा शिकविला म्हणा की, शिवसैनिकांनीच काम केले नाही. असे काहीही विश्लेषण केले जात असले तरी बबनराव घोलपांना कमळाचे ‘काटे’ टोचत राहणार हे मात्र नक्की. देवळालीतील शिवसेनेत फारकाही अलबेल नाही हे आता उघड झाले आहे.  यंदाचे बलाबल पाहाता अवघ्या एका जागेने भाजपाचे पारडे जड आहे. पण हा एक आकडाही सेनेला नेहमीच पराभवाची जाणीव करून देणारा ठरणार आहे. शिवसेनेत कधीनव्हे इतके टोकाचे मतभेद झाले आणि काही प्रभागांत त्याचा फटका सेनेच्या उमेदवारांना नक्कीच बसला. या निकालाच्या निमित्ताने आपापसात लढायचे की भाजपाशी लढाई द्यायची याचा फैसला सेनेला येत्या काळात करावा लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षालाही आत्मपरीक्षणाची गरज आहे. तेच ते चेहरे आणि तेच ते पदाधिकारी, त्यांच्याभोवतीच फिरणारे स्थानिक राजकारण आता त्यांना सोडून द्यावे लागेल. तरुणांची फळी, महिला विंग याकडे या दोन्ही पक्षांचे लक्षच नसल्याचे दिसते. या निकालातून पक्षाचे अस्तित्व पणाला लागलेले असतानाही जर हे दोन्ही पक्ष गाफील राहणार असतील तर मग त्यांना हलवून जागे कोण करणार? हा प्रश्न राहील.