शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन अपघातात पाच ठार

By admin | Updated: January 14, 2017 01:14 IST

तीन युवकांच्या मृत्यूने कसबे सुकेणेवर शोककळा

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई - आग्रा महामार्गावर कोकणगाव फाटा येथे कसबे सुकेणे येथील रहिवासी असलेले तिघेजण पिंपळगाव बसवंत येथे एका खाजगी कंपनीत पहाटे ५.४५ वाजता मोटारसायकलने कामाला जात होते. महामार्ग ओलांडताना पिंपळगाव बसवंतहून नाशिककडे जाणाऱ्या लक्झरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील सचिन वसंत मुंजे (२१), दत्ता अशोक सूर्यवंशी (२८), योगेश मंगळू पवार (२७) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, वाहनाचा शोध सुरू आहे.

दुसरा अपघात सटाणा - ताहाराबाद मार्गावर वनोली गावाजवळ शुक्रवारी सकाळी झाला. ट्रक व ट्रेलर यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील वनोली गावालगत असलेल्या यूटर्नवर सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ट्रक (क्र ं.एमडब्लूए ७४११) व ट्रेलर (क्र ं आरजे ५१ जी १०८)यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दोन्हीही वाहन चालकांचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून अधिक उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.दौलत रामचंद्र साबळे (५०, रा. देवगाव , ता.निफाड) व परमेश्वर जाट (४७, रा.भिलवाड राज्यस्थान) ही मृतांची नावे आहेत.नगर जिल्ह्यातील कारखान्यासाठी ताहाराबाद परिसरातून उस घेऊन जाणारा ट्रक व सटाणा शहराकडून राज्यस्थानकडे जाणारा ट्रेलर होता.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे यांनी सटाणा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देवून जखमींना तात्काळ मदत उपलब्ध करु न दिली. तर मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनाने अपघातग्रस्त वाहने बाजूला करु न महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करु न दिला. सटाणा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.