शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुक्यातील पहिले कोविड सेंटर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:29 IST

वडनेर भैरव : येथील आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर उपचार वेळेत झाल्यास पुढील जीवघेणे अनर्थ टळतील म्हणून चांदवड तालुक्यातील पहिले ग्रामीण भागातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर विलगीकरण या परिसरात सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देऑक्सिजन बेड व वैद्यकीय सेंटर सुरू केले

वडनेर भैरव : येथील आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर उपचार वेळेत झाल्यास पुढील जीवघेणे अनर्थ टळतील म्हणून चांदवड तालुक्यातील पहिले ग्रामीण भागातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर विलगीकरण या परिसरात सुरू करण्यात आले.रुग्णवाढीचा वेग हा कमी जरी होत असला तरीसुद्धा नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत शासकीय नियमांचा अवलंब करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी वडनेर भैरव सेंटर व विलगीकरण कक्षाच्या उद्‌घाटनप्रसंगी ग्रामस्थांना केले.अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी होते. वडनेर भैरव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा या ठिकाणी वडनेर भैरवचे भूमिपुत्र भाऊसाहेब चौधरी यांनी वडनेर भैरवच्या जन्मभूमीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड उपचार व विलगीकरण केंद्र सुरू केले आहे.चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वडनेर भैरव येथे कोरोना रुग्ण उपचारासाठी स्वखर्चाने ऑक्सिजन बेड व वैद्यकीय सेंटर सुरू केले आहे. भुसे यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोविड सेंटरचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. वडनेर भैरवचे सरपंच सुनील पाचोरकर व उपसरपंच योगेश साळुंखे यांच्या हस्ते भुसे व चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. संपत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी माजी आमदार उत्तम भालेराव, ग्रामपंचायत मार्गदर्शक बापूसाहेब पाचोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेना नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख सुनील पाटील, उपप्रमुख नितीन आहेर, नीलेश पाटील, तालुका शिवसेना प्रमुख विलास भवर आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुरेश सलादे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन वडनेर भैरव शिवसेना जिल्हा परिषद गट प्रमुख संतोष मोहन, सुमित भालेराव, युनूस मणियार, लक्ष्मण सलादे, नाना वाटपाडे, नवनाथ शिंदे, विजय निखाडे यांनी केले.विशेष सत्कार वडनेर भैरव येथे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक कोटी एकवीस लाख रुपये द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये योगदान असलेले वडनेर भैरवचे एपीआय गणेश गुरव यांचा गौरव वडनेर भैरव शेतकऱ्यांचा वतीने करण्यात आला.(१५ वडनेर भैरव, १).

चांदवड तालुक्यातील पहिले कोविड सेंटर कार्यान्वितवडनेर भैरव : येथील आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर उपचार वेळेत झाल्यास पुढील जीवघेणे अनर्थ टळतील म्हणून चांदवड तालुक्यातील पहिले ग्रामीण भागातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर विलगीकरण या परिसरात सुरू करण्यात आले.रुग्णवाढीचा वेग हा कमी जरी होत असला तरीसुद्धा नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत शासकीय नियमांचा अवलंब करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी वडनेर भैरव सेंटर व विलगीकरण कक्षाच्या उद्‌घाटनप्रसंगी ग्रामस्थांना केले.अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी होते. वडनेर भैरव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा या ठिकाणी वडनेर भैरवचे भूमिपुत्र भाऊसाहेब चौधरी यांनी वडनेर भैरवच्या जन्मभूमीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड उपचार व विलगीकरण केंद्र सुरू केले आहे.चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वडनेर भैरव येथे कोरोना रुग्ण उपचारासाठी स्वखर्चाने ऑक्सिजन बेड व वैद्यकीय सेंटर सुरू केले आहे. भुसे यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोविड सेंटरचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. वडनेर भैरवचे सरपंच सुनील पाचोरकर व उपसरपंच योगेश साळुंखे यांच्या हस्ते भुसे व चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. संपत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी माजी आमदार उत्तम भालेराव, ग्रामपंचायत मार्गदर्शक बापूसाहेब पाचोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेना नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख सुनील पाटील, उपप्रमुख नितीन आहेर, नीलेश पाटील, तालुका शिवसेना प्रमुख विलास भवर आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुरेश सलादे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन वडनेर भैरव शिवसेना जिल्हा परिषद गट प्रमुख संतोष मोहन, सुमित भालेराव, युनूस मणियार, लक्ष्मण सलादे, नाना वाटपाडे, नवनाथ शिंदे, विजय निखाडे यांनी केले.विशेष सत्कार वडनेर भैरव येथे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक कोटी एकवीस लाख रुपये द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये योगदान असलेले वडनेर भैरवचे एपीआय गणेश गुरव यांचा गौरव वडनेर भैरव शेतकऱ्यांचा वतीने करण्यात आला.(१५ वडनेर भैरव, १).

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक