शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेची ३९८ अ ची पहिली कारवाई

By admin | Updated: October 14, 2014 01:21 IST

नाशिक महापालिकेची ३९८ अ ची पहिली कारवाई

 

नाशिक : धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट न केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेने गोळे कॉलनी येथील मंदार हौसिंग सोसायटीच्या चेअरमनवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारची महापालिकेच्या कारकिर्दीतील ही पहिलीच कारवाई असून, त्यावर कार्यवाही न झाल्यास संबंधिताना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे राज्य शासनाने बंधनकारक केले असून, त्यासाठी विविध महापालिकांच्या कार्यक्षेत्रात विविध अभियंत्यांचीही नियुक्ती करण्यात आली. ३० वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींचे आॅडिट करून त्यांची अवस्था राहण्याजोगी असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न करणाऱ्या सोसायटीच्या चेअरमन आणि सचिवांवर ३९८ अ नुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार २५ हजार रुपये अथवा महापालिका कराची रक्कम यापैकी जी जास्त असेल ती रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. त्याशिवाय फौजदारी कारवाई होते ती वेगळीच. अशा प्रकारचा कायदा आल्याची माहिती नागरिकांमध्ये नसल्याने अनेक धोकेदायक इमारती अद्यापही आॅडिटच्या प्रतीक्षेत असून, अनेक नागरिक त्यात जीव मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. परंतु त्या इमारतींतील एकाही नागरिकाने त्याबाबत हरकत न घेतल्याने आजपर्यंत महापालिकेने केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यापलीकडे काहीही केले नव्हते. त्यामुळे ३९८ अ नुसार थेट कारवाई करण्याची सूचना देणारी नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ असावी.अशा इमारतींपैकी एक असलेल्या गोळे कॉलनी येथील मंदार हौसिंग सोसायटीच्या प्रकरणाची महापालिकेत तक्रार दाखल झाली आहे. तक्रारदार अ‍ॅड. बाळासाहेब चौधरी यांनी याप्रकरणी महापालिकेला कारवाई साठी पत्र दिले होते. त्यानुसार पालिकेने पूर्वसूचना दिल्यानंतरही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठोस कारवाई न केल्याने पालिकेने पुन्हा दुसरी नोटीस जारी केली असून, १८ आॅक्टोबरपर्यंत आॅडिट करून त्याची कागदपत्रे सादर न केल्यास सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे त्या नोटिसीत म्हटले आहे. महापालिका आयुक्तांच्या सहीनिशी ही नोटीस बजाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)