शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

....अखेर गुरख्याच्या खुनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:07 IST

नाशिक : नेपाळचा मूळ रहिवासी असलेला व सध्या निफाड तालुक्यातील माडसांगवी येथे गुरखा म्हणून राहणारा 21 वर्षीय युवक हिरालाल प्रजापती याचा आठवडाभरपूर्वी मध्यरात्री लाकडी दांड्याने मारहाण करुन दहीपुलावर खून करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाला यामध्ये यश आले. त्यांनी एक संशयित आरोपीला गंगाघाट येथून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देसंशयिताला बेड्या : मुलीच्या छेडछाडीच्या संशयावरून भटक्याने केला हल्ला

नाशिक : नेपाळचा मूळ रहिवासी असलेला व सध्या निफाड तालुक्यातील माडसांगवी येथे गुरखा म्हणून राहणारा 21 वर्षीय युवक हिरालाल प्रजापती याचा आठवडाभरपूर्वी मध्यरात्री लाकडी दांड्याने मारहाण करुन दहीपुलावर खून करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाला यामध्ये यश आले. त्यांनी एक संशयित आरोपीला गंगाघाट येथून ताब्यात घेतले.भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी (दि.२८) मध्यरात्री दहीपूल भागात खुनाची घटना घडली होता. पोलिसांनी तपासला गती देत या भागातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयावरूनपिनेश उर्फ पिन्या रमेश खरे (२७, रा. गंगाघाट, मुळ सामोडे, ता. साक्री, जि. धुळे) यास गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने अटक केली. मयत हिरालाल प्रजापती (२१, रा. मडसांगवी) याने खरे याच्या मुलीची छेड काढल्याची कुरापत काढून लाकडी दांड्याने हल्ला चढवून ठार मारल्याची कबुली दिली आहे. पथकाने त्यास गंगा घाटावरील दुतोंड्या मारूतीजवळून ताब्यात घेतले. मयत प्रजापती हा गंगाघाट येथे आला असता, त्याने आपल्या मुलीची छेड काढल्यचा खरे यास संशय आला. मद्यपी खरे याने लाकडी दंडुका घेत त्याचा पाठलाग सुरु केला. प्रजापती याला दहीपुलावर एकटे गाठून लाकडी दांड्याने मारहाण करुन पलायन केले होते. दरम्यान, पाठलाग करण्यासाठी खरे याने एक दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेलतल्याचे समोर येत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली अजय शिंदे, सहायक निरिक्षक सचिन खैरणार, महेश कुलकर्णी आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा कसोशीने तपास करत अखेर उलगडा केला. भद्रकाली गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना याचे धागेदोरे मिळवून संशयिताला बेड्या ठोकण्यास मात्र वाघ यांच्या पथकाला यश आले. 

 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी