शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर लहाडेंचे ‘प्रयाग’ सील : कारवाई

By admin | Updated: April 9, 2017 22:10 IST

महापालिकेच्या आरोग्यविभागाकडून कोणतीही परवानगी न घेता बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करत ‘प्रयाग’नावाचे रुग्णालय सुरू केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात लहाडे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील निलंबीत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करण्याबरोबरच महापालिकेच्या आरोग्यविभागाकडून कोणतीही परवानगी न घेता बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करत ‘प्रयाग’नावाचे रुग्णालय सुरू केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात लहाडे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर रविवारी (दि.९) संध्याकाळी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने प्रयाग रुग्णालय सील केले.जिल्हा शासकिय रुग्णालयात उघडकीस आलेल्या अवैधरित्या २४ आठवड्याच्या गभर्वती महिलेच्या गर्भपात प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जिल्हा रुग्णालयाती स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांचे तातडीने निलंबन करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधानसभेत फरांदे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना दिले. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकिय पथकाने कारवाईला गती देत शनिवारी (दि.८) म्हसरूळ पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला. त्यानंर रविवारी संध्याकाळी सात वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेचे आरोग्य विभागाचे पथक दिंडोरीरोडवरील त्या प्रयागवर येऊन धडकले. पोलिसांसमक्ष पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपुर्ण दुमजली रुग्णालयाची झाडाझडती घेत मेडिकल, लहाडेंचे कक्ष, खोल्या सील केल्या.