...अखेर लहाडेंचे ‘प्रयाग’ सील : कारवाई

By Admin | Updated: April 9, 2017 22:10 IST2017-04-09T22:10:23+5:302017-04-09T22:10:23+5:30

महापालिकेच्या आरोग्यविभागाकडून कोणतीही परवानगी न घेता बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करत ‘प्रयाग’नावाचे रुग्णालय सुरू केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात लहाडे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल

Finally, the 'Prayag' seal of Lahaden: Action | ...अखेर लहाडेंचे ‘प्रयाग’ सील : कारवाई

...अखेर लहाडेंचे ‘प्रयाग’ सील : कारवाई

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील निलंबीत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करण्याबरोबरच महापालिकेच्या आरोग्यविभागाकडून कोणतीही परवानगी न घेता बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करत ‘प्रयाग’नावाचे रुग्णालय सुरू केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात लहाडे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर रविवारी (दि.९) संध्याकाळी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने प्रयाग रुग्णालय सील केले.
जिल्हा शासकिय रुग्णालयात उघडकीस आलेल्या अवैधरित्या २४ आठवड्याच्या गभर्वती महिलेच्या गर्भपात प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जिल्हा रुग्णालयाती स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांचे तातडीने निलंबन करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधानसभेत फरांदे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना दिले. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकिय पथकाने कारवाईला गती देत शनिवारी (दि.८) म्हसरूळ पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला. त्यानंर रविवारी संध्याकाळी सात वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेचे आरोग्य विभागाचे पथक दिंडोरीरोडवरील त्या प्रयागवर येऊन धडकले. पोलिसांसमक्ष पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपुर्ण दुमजली रुग्णालयाची झाडाझडती घेत मेडिकल, लहाडेंचे कक्ष, खोल्या सील केल्या.

 

 

Web Title: Finally, the 'Prayag' seal of Lahaden: Action