शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर कचराकुंडी हटविली

By admin | Updated: September 26, 2016 23:06 IST

ओझर : मारुती वेस परिसरातील नागरिकांमध्ये समाधान

ओझर : येथे मारुती वेसजवळ गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली कचराकुंडी प्रशासनाने आज काढत तेथील जागाही स्वच्छ केली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.सदर कचराकुंडी व दुर्गंधीबाबत ये-जा करणाऱ्या नागरिकांना व शेजारी असलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थी त्रस्त असल्याचे वृत्त १२ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. मंदिरात नियमित येणाऱ्या भाविकांना तर दर्शन घेण्यापूर्वीच कचऱ्याचे दर्शन होत असे. परंतु येथे यापूर्वी तात्पुरती स्वच्छता होत असे. परंतु आता खऱ्या अर्थाने वेस सुशोभित झाली असून, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाले यांनी ओझर येथील ग्रामविकास अधिकारी तसेच प्रशासनाला ताबडतोब ही जागा स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही जागा स्वच्छ करण्यात आली. याबाबत येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामपंचायतीनेदेखील नागरिकांना आता रस्त्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)