शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्येच घरपट्टी भरा, मिळवा पाच टक्के सूटपालिकेची योजना

By admin | Updated: March 24, 2015 00:09 IST

मेमध्ये तीन, तर जूनमध्ये मिळणार दोन टक्के सूट

  नाशिक : महापालिकेने मालमत्ता कराच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल जमा होण्यासाठी मिळकतधारकांसाठी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीसाठी सवलत योजना तयार केली असून, घरपट्टीचे बिल मिळो अथवा न मिळो एप्रिल महिन्यातच संपूर्ण वर्षाची घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना बिलात पाच टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय मे महिन्यात बिल भरणाऱ्यांना ३ टक्के, तर जून महिन्यात बिल भरणाऱ्यांना २ टक्के सवलत दिली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने दरवर्षी सर्वसाधारणपणे आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात मिळकतधारकांना घरपट्टी बिलांचे वाटप केले जाते. मुदतीत बिलाचा भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना महापालिकेमार्फत एक टक्का सूट दिली जात असते. महापालिकेकडून आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये घरपट्टीची बिले पाठविली जात असली तरी मिळकतधारकांकडून मार्चअखेरीस भरणा केला जातो. त्यात बऱ्याचशा मिळकतधारकांकडून वर्षानुवर्षे घरपट्टी भरली जात नाही. घरपट्टीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी महापालिकेने आता एप्रिल ते जून या कालावधीसाठी सवलत योजना तयार केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातही दोन्ही सहामाहीची आगावू रक्कम भरणाऱ्या मिळकतधारकांना सवलत देण्याची तरतूद आहे. त्याचाच आधार घेत आयुक्तांनी शासन निर्णय आणि महासभेच्या ठरावानुसार सवलत योजना तयार केली असून, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात बिलाची रक्कम भरणाऱ्या मिळकतधारकास पाच टक्के सूट मिळणार आहे. तसेच मे महिन्यात बिलाची रक्कम भरल्यास तीन टक्के, तर जून महिन्यात बिलाची रक्कम भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाणार आहे. मिळकतधारकांना सर्वसाधारणपणे आपल्या घरपट्टीची रक्कम माहिती असते. त्यामुळे बिल मिळण्यापूर्वीच मिळकतधारकांनी थकबाकीसह घरपट्टीची रक्कम एप्रिल ते जून या कालावधीत भरल्यास त्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल. यापूर्वी सोलर हिटर वापर करणाऱ्यांना देण्यात आलेली सूट कायम राहणार असल्याचेही आयुक्त गेडाम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)