शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

घरे नावावर करण्यासाठी लढा

By admin | Updated: October 27, 2016 23:36 IST

आरोग्याचा प्रश्न : सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्याची गरज

सिन्नर : गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असतानाही घरे स्वत:च्या नावावर नसल्याची सर्वात मोठी समस्या चार क्रमांकाच्या प्रभागातील नागरिकांची आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून लढा सुरू आहे. प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या ४ हजार ३९२ आहे, तर मतदारसंख्या २ हजार ६७७ आहे. पुरुष मतदार १ हजार ४०६ असून, महिला मतदार १ हजार २७१ आहेत. या प्रभागात वैदूवाडी, जोशीवाडी, खर्जे मळा, कुंभार भट्टी, माकडवाडी, गौतमनगर, मांगवाडा, पोलीस वसाहत, पाण्याची टाकी, पंचायत समितीजवळील भाग या परिसराचा समावेश होतो.उत्तर भागात मंगल शिंदे घर ते गोंदेश्वर पाण्याची टाकी ते खर्जे मळा ते सातपुते मळा, पूर्व भागात सातपुते मळा ते तहसील कार्यालय दक्षिण कोपरा. दक्षिण भाग तहसील कोपरा ते हुतात्मा चौक. आणि पश्चिम भागात हुतात्मा चौक ते सोमावडारी घर ते अभिमन्यू चव्हाण ते विष्णू पाबळे दुकान ते रेडी गोडावून ते दक्षिणेकडे पंचायत समिती उत्तर कोपरा ते संत गोरोबा पतसंस्था नायगाव रोड ते मंगल शिंदे घर अशा प्रभाग चारच्या चतु:सीमा आहेत. पूर्वी हा परिसर प्रभाग क्रमांक एक मध्ये होता. नव्या प्रभागरचनेत हा परिसर प्रभाग चार क्रमांक म्हणून ओळखला जात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागाचे प्रतिनिधित्व माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगसेवक विठ्ठल उगले, मल्लू पाबळे, मंगला जाधव व शीतल कानडी यांनी करतात. या प्रभागात काही गटारी व अंतर्गत रस्त्याची कामे मार्गी लागली आहेत. पाण्याच्या टाकीजवळ कॉँक्रीटीकरण झाले असून, प्रभागात पथदीप बसविण्यात आले आहेत. गंगावेस ते म्हसोबा मंदिरमार्गे हुतात्मा स्मारकापर्यंत बारा मीटर लांबीचा फूटपाथसह रस्ता झाला आहे. खर्जे मळ्यात बगिचाचे काम प्रगतिपथावर आहे. (वार्ताहर)