शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

बिलपुरीच्या साडेतीनशे ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Updated: September 8, 2016 00:56 IST

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

 सटाणा : तालुक्यातील गोराणे येथील सविता देसले हिचा घातपात केला असताना अपघात झाल्याचे दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपअधीक्षकांसह जायखेडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षका विरु द्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी बुधवार पासून विवाहितेच्या माहेरच्या बिलपुरी येथील साडे तीनशे कुटुंबीयांनी पाणी,अन्नाचा त्याग करून राम मंदिराजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे.तालुक्यातील गोराणे येथील विवाहिता सविता देसले (२७) ही विवाहिता गेल्या २५ जुलै रोजी बिलपुरी येथे माहेरी गेली होती. दुसऱ्या दिवशी रात्री पती अरविंद श्रावण देसले याच्या सोबत मोटरसायकलने गोराणेकडे येत असतांना अंधाराचा फायदा घेत आसखेडा शिवारात अरविंदने लोखंडी सळईने सविताच्या डोक्यात वार करुन खून केला होता.असे असतांना अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर व पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांची भेट घेऊन सत्य घटना सांगून खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सविताच्या नातेवाईकांनी केली होती.मात्र दोन्ही अधिकाऱ्यांनी हा घातपात नसून अपघातच असल्याचे ठासून सांगत अरविंद देसले याला पाठीशी घातले आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त बिलपुरीच्या ग्रामस्थांनी खून करणाऱ्या आरोपीला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात बागलाण तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला होता.दरम्यान सहा दिवस उलटूनही संबधित दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न झाल्याने आज बुधवार पासून बिलपुरी येथील सुमारे साडे तीनशे कुटुंबीयांनी गावातीलच राम मंदिराच्या चौकात अन्न ,पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण सुरु केले आहे. संबधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही आणि सविताला न्याय मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.