शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी व्यवहारातून तरुणावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: January 14, 2017 00:59 IST

फुलेनगर : शस्त्राने वार; तरुण जखमी

 पंचवटी : व्याजाने दिलेली रक्कम परत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून पेठरोडवरील फुलेनगर (भराडवस्ती) येथे राहणाऱ्या युवकावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना
शुक्र वारी दुपारी घडली आहे.
या घटनेत चंदू विष्णू सावंत हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शासकीय $$्निरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भराडवस्तीत राहणाऱ्या चंदू सावंत याने काही दिवसांपूर्वी परिसरातील संशयित आरोपी शरद लोखंडेकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. सावंत याने व्याजाने घेतलेली रक्कम परत मिळावी यासाठी संशयित लोखंडे याने तगादा लावला होता. सावंत शुक्र वारी दुपारी परिसरात दिसताच संशयित शरद लोखंडे, प्रेम शिंदे व कपिल शिंदे अशा तिघा संशयितांनी सावंत याला रस्त्यात अडविले. संशयितांच्या हातात धारदार शस्त्र असल्याने सावंत याने जीव वाचविण्यासाठी पळ काढला. त्यावेळी संशयितांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व हातातील धारदार शस्त्राने वार केला. त्यात सावंत याच्या कानाला, गालावर व हातावर घाव लागल्याने तो जखमी झाला
आहे. याप्रकरणातील तिन्ही संशयित आरोपींविरोधात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)