खत प्रकल्पातील चोरीत कुंपणच खाते शेत

By Admin | Updated: March 10, 2015 23:32 IST2015-03-10T23:31:44+5:302015-03-10T23:32:14+5:30

अटक : सुरक्षारक्षकाचा समावेश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Fertilizer project farm | खत प्रकल्पातील चोरीत कुंपणच खाते शेत

खत प्रकल्पातील चोरीत कुंपणच खाते शेत

नाशिक : महापालिकेचा गौळाणे रोडवरील खत प्रकल्प बंद असण्याबरोबरच तेथील साहित्य व मशिनरीही चोरीला जात आहेत़ विशेष म्हणजे या खत प्रकल्पाच्या सुरक्षारक्षकाचाच यामध्ये सहभाग असल्याने कुंपणच शेत खात असल्याचे समोर आले आहे़
शनिवारी (दि़७) रोजी या खत प्रकल्पातील सहा इलेक्ट्रिक मोटारी चोरीस गेल्या होत्या़ यामध्ये इंदिरानगर पोलिसांनी पाच संशयिताना अटक केली दरम्यान, त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़
गौळाणे रोडवर महापालिकेच्या खतप्रकल्प बंद अवस्थेत आहे. यातील मशिनरीची चोरीही झाली आहे़ या प्रकल्पावरील सहा इलेक्ट्रिक मोटरी शनिवारी (दि़ ८) चोरून नेल्या़
या चोरी प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित विलास मदन गवळी, दीपक धनराज माळी, नितीन शांताराम पिंगळे, जयेश अशोकराव अहेर व देवीदास प्रताप राठोड या पाच संशयितांना सोमवारी रात्री अटक केली़ त्यातील देवीदास राठोड हा सुरक्षारक्षक म्हणून कामास आहे़

Web Title: Fertilizer project farm