सटाणा : बागलाण तालुक्यातील सिंचनाचे प्रलंबितकामे मार्गी लागावेत यासाठी शासनाकर्ते व संबंधित विभागाचे अधिकारी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने एक दिवसीय उपोषण बागलाण विकास मचंच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले़ सिंचन कामांमध्ये शहराचा पाणीप्रश्न, हरणबारी डावा व उजव्या कालव्याचे प्रलंबित कामे, पुनद धरणावरील सुळे डावा कालवा, बागलाणमधील नदी जोड प्रकल्प, सुळे डावा कालवा, ३० ते ३५ गावांचा सिंंचनाचा प्रश्न असलेला तळवाडे पोहच कालवा, मोसम व आरम नदीवरील केटीवेअर, भंडारदरा धरणावरील पठावे कालवा, वाघळे बंधाऱ्यात आवळाई नाल्याचे काम, हरणबारी डावा व उजवा कालव्याचे काम आदि कामे प्रलंबित असल्याचे म्हटले आहे़ याप्रसंगी डॉ़ संजय पाटील, अण्णा अहिरेख संजय पवार यांच्यासह आंदोलनात नंदकिशोर शेवाळे, अविनाश साावंत, श्याम बगडाणे, गौरव शिंदे, रविंंद्र सोनवणे, जीवन सोनवणे, प्रकाश शेवाळे, संजय ह्याळीज, दर्यावसिंंग पवार, प्रशांत कोठावदे, जीवन सोनवणे, दिनेश सावळा, राजेश परदेशी, अण्णा जगताप, किशोर शेवाळे, प्रवीण खैरणार आदि कार्यकर्ते सामील होते.यावेळी खासदार सुभाष भामरे यांनी भेट देऊन दिली.(वार्ताहर)
बागलाण विकास मंचचे उपोषण
By admin | Updated: August 22, 2014 00:30 IST
बागलाण विकास मंचचे उपोषण
बागलाण विकास मंचचे उपोषण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}