शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा आज जिल्ह्यात चक्का जाम शेतकरी, कामगार संघटनांचा सहभाग : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 01:06 IST

नाशिक: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (दि.६) नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी व कामगार संघटना चक्का जाम आंदोलन करणार आहेत.

नाशिक: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (दि.६) नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी व कामगार संघटना चक्का जाम आंदोलन करणार आहेत.दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. ६) देशभरातील शेतकऱ्यांना चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यात किसान सभा व आयटकचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत. नाशिक तालुक्यातील शेतकरी सिन्नर फाटा येथे सकाळी ११ वाजता बहुजन शेतकरी संघटना व किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रास्ता रोको करून चक्का जाम करणार आहेत. तर निफाड तालुक्यातील चांदोरी येथे क्रांतिवीर छावा सेना व किसान सभेसह अन्य शेतकरी व कामगार संघटना सकाळी ९ वाजेपासूनच चक्का जाम करणार आहेत. त्याचप्रमाणे चांदवड, नांदगाव व मनमाड येथेही शेतकरी व कामगार दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सकाळी ११ वाजेपासून रास्ता रोको करून आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. जिल्ह्यात किसान सभा, माकप, भाकप यांच्यासह छावा क्रांतिवीर संघटना व समविचारी शेतकरी कामगार संघटना तालुका पातळीवर आंदोलन करून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणार आहेत.केंद्र सरकार दिल्लीतील शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी अमानुषपणे दडपशाही करीत असल्याचा आरोप करीत आंदोलनात सहभागी होऊन जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्धार जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांनी केला आहे.इन्फो-केंद्राकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ; किसान सभेचा आरोपसरकारने दिल्लीतील आंदोलनस्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले असून आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्नपदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये. यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजन, राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, राज्य सचिव राजू देसले यांनी केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक