शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: March 30, 2017 23:28 IST

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील भव्य मोर्चा काढण्यात आला.

 सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील भव्य मोर्चा काढण्यात आला. नागपूर-मुंबई महामार्गासाठी करण्यात येणारी मोजणी त्वरित थांबविण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी महेश पाटील व तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले.गुरुवारी सकाळी बसस्थानक परिसरात समृद्धी महामार्गामुळे बाधीत होणारे शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. हातात फलक घेऊन शासनविरोधी घोषणा देत बसस्थानकापासून मोर्चाला प्रारंभ झाला. गावठा, नेहरू चौक, गणेशपेठ, शिवाजी चौक, वावीवेसमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडवला. ठरावीक प्रतिनिधींनाच निवेदन देण्यासाठी आत जाता येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यानंतर संतप्त मोर्चेकऱ्यांनी शासनविरोधी घोषणा देण्यासाठी प्रारंभ केला. त्यामुळे पोलिसांनी केवळ महिलांना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोडण्याचा निर्णय घेतला. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उर्वरित आंदोलनकर्त्यांनाही तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोडण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात छोटेखानी सभा पार पडली. या सभेत मोर्चेकऱ्यांनी आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. शहापूर येथील बबन हारणे यांनी समृद्धी महामार्गाच्या धोरणावर शासनावर कडाडून टीका केली. समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर लोकप्रतिनिधी व सनदी अधिकाऱ्यांच्या समृद्धीसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. या महामार्गाच्या सर्व्हेचे काम मुख्यमंत्र्यांच्या भावाला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी बेनामी माालमत्ता घेतल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या न करता कडाडून विरोध करण्याचे आवाहन हारणे यांनी केले. कोणत्या शेतकऱ्यांनी या महामार्गाची मागणी केली त्यांची नावे अगोदर जाहीर करा, अशी मागणी किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले यांनी केली. यावेळी अ‍ॅड. सुभाष हारक, अ‍ॅड. राजेंद्र घुमरे, नंदा पवार, कचरू डुकरे, एल.एम. डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात राजू देसले, बबन हारणे यांच्यासह शांताराम ढोकणे, राजेंद्र घुमरे, नामदेव शिंदे, कचरू डुकरे, सोमनाथ वाघ, के. एम.सांगळे, मच्छिंद्र चिने, नामदेव आरोटे, शहाजी पवार, केरू पवार, अंबादास वाजे, भास्कर गुंजाळ, शिवाजी चव्हाणके, नीलेश गुंजाळ, कृष्णा दराडे, आनंदा कोठुंगे, जालिंदर आढाव, नवनाथ ढोली, तानाजी तुपे, अ‍ॅड. दामोदर पाजीरे, चिंतामण वाघ, सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)