शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफी हा संवेदनशील मुद्दा : पवार

By admin | Updated: April 3, 2017 02:07 IST

नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी संवेदनशील मुद्दा असून, त्याबाबत जनमत तयार होत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

 नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी संवेदनशील मुद्दा असून, त्याबाबत जनमत तयार होत आहे. कर्जमाफीसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, संघर्ष यात्रेचा समारोप पनवेल येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मुरबाड येथील कार्यकर्ता मेळाव्याहून ते नाशकात दाखल झाले असून, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, शिवसेना आपल्या सोबत आल्यास स्वागतच करू, असेही पवार म्हणाले. हॉटेल एमराल्ड पार्क येथे रात्री शरद पवार यांचे मुक्कामासाठी आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर लढा सुरूच राहणार आहे. हा संवेदनशील मुद्दा आहे. या मुद्द्यावर जनजागृती करण्याची गरज होती. त्यानुसार ही यात्रा काढण्यात आली. ईव्हीएम मशीनमधील गोंधळाबाबत त्यांनी पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडणे चुकीचे असल्याचे सांगून निवडणुकीत आपला पक्ष प्रभावी ठरू शकला नसल्याचीही कबुली दिली. ईव्हीएम मशीनबाबत तक्रारी आल्या असल्या तरी त्यात तथ्य नसल्याचेही पवार म्हणाले. मात्र मध्य प्रदेश आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी याबाबत आक्षेप नोंदविला असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. प्रारंभी आमदार जयंत जाधव, हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, नाना महाले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजयश्री चुंबळे, सदस्य अमृता पवार, युवक कॉँगे्रसचे आकाश पगार यांनी त्यांचे स्वागत केले.