शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातुर

By Admin | Updated: September 11, 2016 01:06 IST2016-09-11T01:06:05+5:302016-09-11T01:06:20+5:30

शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातुर

Farmers anxious because of the drop in the prices of the produce | शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातुर

शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातुर

खामखेडा : कांदाही गडगडलाखामखेडा : सध्या सर्वत्र कांदा, टमाटे, कोबी, कोथिंबीर आदि पिकांचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. गेल्या महिन्यात तब्बल दीड महिना कांदा मार्केट बंद असल्याने कांद्याच्या आवकमध्ये वाढ झाल्याने कांदा शंभरपासून ते पाचशे रुपयापर्यंत विकाला जात आहे.
उन्हाळी कांदा ज्या वेळेस काढणीचा हंगाम चालू होता त्यावेळेस ओला कांदा आठशे ते एक हजार रुपयापर्यत मार्केटमध्ये विकाला जात होता. त्यावेळेस काही शेतकर्यांनी काही कांदा विकला व पुढे चांगला भाव मिळेल या आपेक्षने चाळीत साठवणुक करून ठेवला होता. शासनाने आडत ही शेतकर्याकडून वसूल न करता ती आडत माल खरेदीदाराकडून वसूल करण्यात यावा.असा निर्णय घेण्यात आला. या निर्णया विरोधात व्यापारयांनी माल खरेदी बंद करण्यात आली. आणि तब्बल पंधरा दिवस मार्केट बंद होते. पुन्हा व्यापारी, शासकीय अधिकारी यांच्यात चर्चा होऊन शेतकर्याने कांदा विक्र ीसाठी अणंताना तो गौणीत भरून आणावा असा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. आणि मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आला नाही. या खेळीत कांदा मार्केट तब्बल दीड महीने बंद राहिल्याने आता मार्केटमध्ये कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा झाली आहे. ज्या वेळेस उन्हाळी ओला कांद्याच्या एका ट्रक्टर ट्रॉलिचे सरासरी आठशेच्या भावाने चोवीस ते पंचवीस हजार रूपये येत होते. या दिवसामघ्ये कांदा सरासरी पंधराशे ते डॉन हजार रु पया पर्यत विकला जात असे.त्यामुळे चांगल्यापैकी पैसा हाती येत असे. आता कांद्याच्या ट्रॉलीच्या वजनात घट होऊन फक्त वीस क्विटल वजन येऊन तीनशे रूपये भावाने विकला जाऊन सात ते आठ हजार रूपये येत आहेत. त्यात वाहन भाडे, हमाली इतर खर्च वजा जाता पाच ते सह हजार रूपये हाती येत असल्याने कांद्यावरील आर्थिक गणित बिघडले आहे. यानंतर शेतकऱ्यांची सर्व अपेक्षा टमाटे पिकावर होती. परंतु टमाटयाचे भाव सध्या एका कॉरेटला कधी दीडशे, कधीदोनशे ते कधी शंभर असा भाव मिळत आहे. (वार्ताहर)



 

Web Title: Farmers anxious because of the drop in the prices of the produce