शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात घसरण बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:43 IST

कवडदरा : कोरोनाचा परिणाम शेतमालावरही दिसत आहे. सध्या कांद्याची मागणी घटली असून, साठवलेला कांदा सडत असल्याने आवक वाढली आहे.

कवडदरा : कोरोनाचा परिणाम शेतमालावरही दिसत आहे. सध्या कांद्याची मागणी घटली असून, साठवलेला कांदा सडत असल्याने आवक वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली. घरगुती वापरासाठी लागणारा कांदा विक्री सुरू असली, तरी दरात अद्याप समाधानकारक सुधारणा झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, यंदा कमी कालावधीत कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज झाला आहे. कमी दरात कांद्याची विक्री करण्याची वेळ आली आहे. कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला. चाळीतील कांदाही सडू लागला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकरी विक्री करीत आहेत. सहाशे ते आठशे रुपये क्विंटल दरातून कांदा उत्पादनाचा खर्चही सुटत नसल्याचे कांदा उत्पादक रवी निसरड यांनी सांगितले. साठवण करूनही तोटाच होत आहे. उन्हाळी कांदा काढला, त्यावेळी एक ते दीड हजार रुपये क्विंटल दर होता. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्­यता होती. परंतु, सध्या सहाशे ते आठशे रुपये दर मिळत आहेत. तसेच चाळीत साठवलेला कांदा यंदा तीस टक्के सडला आहे. त्यामुळे कांद्याची साठवण करुन फायदा झाला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात.

टॅग्स :onionकांदा