शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांची बॅग चोरणारे अटकेत

By admin | Updated: August 22, 2015 23:48 IST

बनावट नोटांची बॅग चोरणारे अटकेत

नाशिकरोड : पंजाब पोलिसांनी जप्त केलेली अडीच लाखांची बनावट नोटांची बॅग चोरून नेणाऱ्या चोरट्याला अमरावती पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडण्यात यश मिळविले आहे. चोरट्याकडून १०० रुपयांच्या २२ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.पंजाबच्या बर्नाला पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी बनावट नोटा जप्त केल्या होत्या. २ लाख ५८ हजार ५०० रुपयांच्या या बनावट नोटा तपासण्यासाठी पंजाब पोलीस नाशिकरोडच्या चलार्थ पत्र मुद्रणालयात आले होते. नोटा बनावट असल्याची खात्री करून पंजाब पोलीस त्या नोटांची बॅग घेऊन गेल्या ११ जूनला रात्री रेल्वेस्थानकावरील नवीन पादचारी पुलावरून प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर जात होते. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने सदर बॅग चोरून नेली होती. या प्रकरणी रेल्वेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भाबल, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार, हवालदार मांगुलाल पाळदे यांनी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व त्याद्वारे फोटो काढून संशयितांची माहिती विविध पोलीस ठाण्यांना व चलार्थ पत्र मुद्रणालयाला कळवली होती. दरम्यान, अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी बनावट नोटा बाजारात चालविणाऱ्या अरशिदखॉ रशिदखॉ (३३) रा. अलीमनगर अमरावती यास पकडून काही बनावट नोटा जप्त केल्या. अमरावती कोतवाली पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटा तपासण्यासाठी चलार्थ पत्र मुद्रणालयाशी संपर्क साधला असता रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.