शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान सदस्यांना द्यावी लागेल वाढीव संपत्तीची माहिती

By admin | Updated: January 20, 2017 23:37 IST

आयोगाचा निर्णय : उमेदवारांचा ‘बायोडाटा’ होणार खुला; नागरिकांना मिळणार माहिती

नाशिक : लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीची निवड करताना त्याच्याविषयीची सर्व माहिती मतदाराला असावी यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्रतिज्ञापत्राद्वारे स्वत:ची माहिती जाहीर करावी लागणार असून, यापूर्वी जर निवडणूक लढविलेली असेल तर अशा लोकप्रतिनिधींना गेल्या निवडणुकीच्या वेळी नमूद केलेल्या संपत्तीची व सध्याच्या संपत्तीची माहितीदेखील जनतेसाठी खुली करावी लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयाने लोकप्रतिनिधी झाल्यानंतर संपत्तीत वाढ झालेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, जनतेमध्येही उमेदवारांच्या मालमत्तेविषयी उत्सुकता वाढीस लागली आहे.  राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात आदेश काढून उमेदवाराने नामांकन सादर करताना द्यावयाच्या शपथपत्रात काही बदल सुचविले असून, होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने उमेदवाराचे वय, शिक्षण, व्यवसाय, अपत्यांची संख्या, दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीकरिता शिक्षा होऊ शकेल अशा प्रलंबित प्रकरणांची संख्या, ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आलेले आहे आणि एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे अशा प्रकरणांची संख्या, उमेदवाराचा पॅन क्रमांक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचा तपशील, कुटुंबाच्या स्थावर मालमत्तेचा तपशील, एकूण मालमत्ता, देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्थांकडील दायित्वे, थकीत रकमा याची माहिती उमेदवारांना शपथपत्रावर द्यावी लागणार आहे.  अलीकडेच राज्य आयोगाने उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात प्रामुख्याने उमेदवारावर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची माहिती मतदारांना व्हावी व त्यांनी सदसद्विवेकबुद्धीने मतदान करावे असा त्यामागचा हेतू आहे.