शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खतप्रकल्पासाठी आणखी वाढीव आरक्षण

By admin | Updated: September 12, 2015 23:16 IST

विकास आराखडा : पाथर्डीच्या शेतकऱ्यांचा विरोध

नाशिक : खतप्रकल्पासाठी यापूर्वी आरक्षित केलेल्या ९७ एकर क्षेत्रापैकी अवघ्या २० एकर क्षेत्रावर खतप्रकल्प कार्यान्वित असून, उर्वरित क्षेत्र वापराविना पडून असतानाही आणखी वाढीव आरक्षण टाकण्यास पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत खासदार हेमंत गोडसे व आमदार सीमा हिरे, आमदार योगेश घोलप यांनी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा करत निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे, पाथर्डी शिवारातील सर्व शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. खतप्रकल्पासाठी यापूर्वी या शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील सुमारे ७० एकर क्षेत्र अजूनही वापराविना पडून आहे. त्यामुळे नव्याने आरक्षण टाकण्याची गरज नाही. आता नव्याने आरक्षण टाकलेले सर्व क्षेत्र हे बागायती असून, शेतीवरच संबंधित जागामालकांची उपजीविका चालते. याच शेतामध्ये गेल्या ५०-६० वर्षांपासून सदर शेतकरी घरे बांधून निवासही करत आहेत. महापालिकेने सन १९९३ च्या विकास आराखड्यात मौजे मखमलाबाद व पिंपळगाव बहुला या ठिकाणी कचरा डेपोसाठी आरक्षण टाकलेले आहे. भविष्यात सदर जागा महापालिकेला उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर आणखी नव्याने आरक्षण टाकून बेघर करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार योगेश घोलप, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह सेनेचे नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)