शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात नाशिककरांना थंडीचा अनुभव : किमान तपमान १०.४

By admin | Updated: March 12, 2017 20:37 IST

आठवडाभरापासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, किमान तपमानात सातत्याने घट होत आहे.

नाशिक : आठवडाभरापासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, किमान तपमानात सातत्याने घट होत आहे. यामुळे नाशिककर चार दिवसांपासून उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घेत आहेत.फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ३६.१ अंश इतक्या कमाल तपमानाचा उच्चांक राहिला होता. यानंतर चालू महिन्याचे चार दिवस नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवली. शहरातील हवामानात अचानकपणे बदल होऊन थंड वारा वाहू लागल्याने कमाल तपमानाचा पारा खाली उतरला आहे. याबरोबरच रविवारी (दि.१२) किमान तपमानाचा पारा कमालीचा घसरून थेट १०.४ अंशावर स्थिरावला. वाऱ्याचा वेग आणि गारवा जास्त असल्यामुळे शहराचे वातावरण थंड झाले आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपासूनच नागरिकांना थंडी जाणवत आहे. सूर्यास्तानंतर थंडीची तीव्रता वाढत असल्याचा अनुभव नाशिककरांना सध्या येत आहे. यामुळे रात्री घरातील पंखेदेखील बंद ठेवणे पसंत केले जात आहे. एकूणच नागरिक सध्या उन्हाळ्यात हिवाळा अनुभवत आहे.शनिवारी किमान तपमान १६.० अंश इतके नोंदविण्यात आले होते, तर रविवारी थेट सहा अंशांनी पारा घसरला. यामुळे रविवारी संध्याकाळपासूनच थंडीची तीव्रता वाढली होती. होळीनंतर थंडी संपुष्टात येते, असे म्हटले जाते. मात्र होळीच्या रात्रीदेखील किमान तपमान कमीच नोंदविले गेले. होलिकोत्सवानिमित्त शहरात संध्याकाळनंतर चौकाचौकात होळी पेटविण्यात आल्याने थंडीचा प्रभाव कमी जाणवला. आगामी कालावधीत मात्र निसर्ग पुन्हा आपले रूप बदलण्याची शक्यता असून, कमाल तपमान वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. कारण अजून उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक असले तरी गेल्या वर्षाचा अनुभव बघता जूनच्या पंधरवड्यापर्यंत नाशिककरांनी कडक उन्हाच्या झळा सोसल्या होत्या. जून महिन्यात सर्वाधिक कमाल तपमान ३५ अंशापर्यंत होते. जूनअखेर पहिल्या पावसाने शहरात हजेरी लावल्याने जवळपास १मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली होती.

शहराचे तपमान असे...दिनांक   कमाल   किमान७ मार्च  ३२.६      १४.३८ मार्च  ३२.४     १४.६९ मार्च   ३१.१       १४.९१० मार्च  २८.६     १२.९११ मार्च  २७.६     १६.०१२ मार्च  २९.९     १०.४