नाशिक : जुने नाशिक येथील वडाळा नाका परिसरात महालक्ष्मी चाळीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाल्मीकी मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. होमहवन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी सुरेश दलोड, सुरेश मारू, राजेंद्र कल्याणी, पंडित ससाणे, विनोद दलोड, पंडित मारू, रामसिंग बावरी आदि उपस्थित होते. मेघवाळ समाजाच्या वतीने वाल्मीकी जयंती साजरी करण्यात आली. शरद अहेर यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}