आईसाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By Admin | Updated: July 21, 2014 00:41 IST2014-07-20T22:41:13+5:302014-07-21T00:41:24+5:30

आईसाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Excellent students felicitate at the eisaheb school | आईसाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आईसाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 नाशिकरोड : पळसे ग्रामविकास संचलित संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून पाचवी ते आठवी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बॅँकेचे मुख्य प्रबंधक एन. पी. धुमाळ, नारायण वाजे, अध्यक्ष अरुण वारूंगसे, विष्णुपंत गायखे आदि उपस्थित होते.यावेळी दहावीतील तसेच चौथी व सातवीतील शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना भारत ढेरिंगे यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. प्रास्ताविक राजाराम गायधनी यांनी केले. सूत्रसंचलन अशोक गायधनी व आभार एस. व्ही. बोरसे यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक टी. के. गाडे, राजाराम गायधनी, बबन थेटे, शिवाजी गायखे, बबन गायधनी, रूंजाभाऊ गायधनी, विजय क्षिरसागर, चंद्रभान आगळे, रमेशचंद्र मोरे, नामदेव गायधनी, लीलाबाई गायधनी, संजय गायधनी, सुभाष लभडे आदि उपस्थित होते.

Web Title: Excellent students felicitate at the eisaheb school