शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदान; साशंकता कायम

By admin | Updated: August 20, 2014 00:41 IST

पालिकेची आर्थिक टंचाई : ९२ कोटींची देयके प्रलंबित

नाशिक : जकात आणि स्थानिक संस्था कर या वादात व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कराची देयकेच न भरल्याने अडचणीत आलेल्या महापालिकेची सुमारे ९२ कोटींची देयके थकीत आहेत. यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होत असताना, दिवाळीमध्ये दिले जाणारे सानुग्रह अनुदान वेळेत मिळेल काय याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये साशंकता आहे.महापालिकेकडे दर महिन्याला सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांची रक्कम जमा होते. त्यातून कर्मचाऱ्यांच्या पगाराशिवाय इतर देयकेही दिली जातात. त्यात मोठा वाटा हा ठेकेदारांच्या रकमांचा असतो. ७५ टक्क्यांहून अधिक रक्कम ठेकेदारांना कामांच्या मोबदल्यात दिली जाते. त्यामुळे एलबीटीच्या रूपात पालिकेला मिळणाऱ्या रकमेतून आधी पगार केले जातात. गेल्या दोन महिन्यांपासून एलबीटी जाऊन जकात येणार या बातम्यांची चर्चा असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी त्याचा भरणाच केला नाही. त्यामुळे पालिकेत आर्थिक टंचाई निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरापूर्वीदेखील पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे जिकिरीचे झाले होते. कसेबसे त्यांचे पगार केल्यानंतर ठेकेदारांना थोडी देयके दिली गेली होती. थकीत देयकांमध्ये यंदा भूसंपादनाच्या २८ कोटी रुपयांचीही भर पडल्याने ही रक्कम आता ९२ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. या महिन्यात एलबीटी बिले आणि शासनाचा पैसा आल्यास त्याद्वारे थकीत देयके आणि वेतने दिली जातील; परंतु एलबीटीच्या वादात जर व्यापाऱ्यांनी रक्कमच लवकर भरली नाही तर आॅक्टोबर महिन्यात पुन्हा देयके रखडतील अणि कामगारांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आॅक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने सानुग्रह अनुदान देणे भाग पडणार असून, त्यासाठी रकमेची जमवाजमव करताना पालिकेच्या नाकीनव येतील, अशी शक्यता कर्मचाऱ्यांनीच व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)