शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित कुंभमेळ्यासाठी सर्वजण कटिबद्ध

By admin | Updated: July 21, 2014 01:31 IST

सुरक्षित कुंभमेळ्यासाठी सर्वजण कटिबद्ध

 

नाशिक : पौराणिक महत्त्व असलेल्या येथील कुंभमेळ्याचे सुरक्षित व सुंदररीत्या आयोजन करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अमेरिका येथील एमआयटीचे जॉन वर्नर यांनी येथे केले़गंगाघाटावर रामकुंडाला भेट दिल्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधत होते़ संदीप फाउंडेशन, एमआयटी नाशिक , खांडबहाले डॉट कॉम यांच्या वतीने आयोजित कुंभथॉन-३ या परिषदेसाठी हे संशोधक आले आहेत़ कुंभथॉनमध्ये शहरात होणार असलेल्या कुंभमेळ्यातील विविध समस्यांवर तांत्रिकदृष्ट्या उपाययोजना शोधण्यात येत आहेत़ संदीप फ ाउंडेशन येथे तीन दिवस ही परिषद होणार आहे़ वर्नर म्हणाले, कुंभथॉनअंतर्गत मागील कुंभमेळ्याचा अभ्यास करण्यात येत आहे़ त्यावेळी उद्भवलेल्या प्रमुख समस्यांचा अभ्यास करून त्यावर कमी वेळात व तांत्रिक दृष्ट्या उपाययोजना करण्यात येणार आहेत़ कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, नियंत्रण, सुरक्षितता, अन्न, प्रदूषण, आरोग्याच्या समस्या यांचा यामध्ये समावेश आहे़ त्यावर भारतासह अमेरिकेत संशोधन करण्यात येणार आहे़ या संशोधनाचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात येणार असून, या माध्यमातून कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व संस्था प्रयत्न करणार आहेत़ महापौर यतिन वाघ म्हणाले, कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन, सुरक्षेच्या दृष्टीने कुंभथॉनमध्ये संशोधन केले जात आहे़ प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरणाऱ्या संशोधनांचा स्वीकार करून त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न महापालिका तसेच जिल्हा प्रशासन करणार आहे़ मागील कुंभमेळ्याचा व आताच्या वस्तुस्थिती व नियोजनाचा अहवाल एमआयटीकडून महापालिकेलाही सादर होणार आहे़ आधुनिक पद्धतीने उपाययोजना होत असतील तर त्यांचे स्वागतच आहे़ याप्रसंगी टेपो जॉटन्स, पीट बेल, एम़ जे़ जॉटन्स, ब्रुस हेच, डॉ़ जॉन मॅकडॉनल्ड, अ‍ॅथनॉसी अ‍ॅथनासियाडीस, इंडिया एमआयटीचे क्षितिज मारवा, गौतम मोरे, बाल महाले, अरविंद चिंचोरे, नीलेश साळगावकर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)