मालेगावी ऑक्सिजन बँकेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST2021-05-07T04:15:09+5:302021-05-07T04:15:09+5:30

बँकेचे उद‌्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल, हरिप्रसाद गुप्ता, सामाजिक ...

Establishment of Malegaon Oxygen Bank | मालेगावी ऑक्सिजन बँकेची निर्मिती

मालेगावी ऑक्सिजन बँकेची निर्मिती

बँकेचे उद‌्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल, हरिप्रसाद गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, मुकेश झुनझुनवाला, नगरसेवक विजय देवरे, संजय काळे, नंदू सोयगावकर, हरकचंद जैन, दिलीप जैन, महेश पाटोदिया, कैलास शर्मा, रामा देवरे, निखिल चव्हाण, अशोक रानासरिया, रविराज सोनार, यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी या संकल्पनेचे प्रमुख देवा पाटील यांनी सांगितले की आपणास कोरोना काळात ऑक्सिजनची प्रचंड आवश्यकता असतांना तुटवडा जाणवत होता. ही उणीव लक्षात घेता मालेगावात अश्याप्रकारे ऑक्सिजन बँकेची निर्मिती करण्याचा संकल्प केला. ही शहरातील पहिली ऑक्सिजन बँक असेल. ज्यामध्ये पूर्णतः मोफत सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शरद पाटील, केशव सूर्यवंशी, कमलेश सोनवणे, राजेंद्र पाटील, सुनील शेलार, श्याम गांगुर्डे, किरण पवार, संदीप मोरे, अंकित पिंगळे, सारंग भावसार, पप्पू पाटील, भूषण शिंदे, अनिल पाटील, मयूर पाटील, रोशन गांगुर्डे आदि उपस्थित होते.

Web Title: Establishment of Malegaon Oxygen Bank