शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

उमराणे बाजार समितीची निवडणूक जाहीर

By admin | Updated: January 4, 2016 23:29 IST

२१ फेब्रुवारीला मतदान : २२ ला होणार मतमोजणी

उमराणे : येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीची २०१६-२१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी निवडणूक जाहीर झाली असून, २१ फेब्रुवारीला मतदान, तर दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना बाजार समितीला सोमवारी (दि. ४) प्राप्त झाली.२०१२ मध्ये मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन स्वतंत्र उमराणे बाजार समिती अस्तित्वात आली. त्यानंतर दोन वर्षं प्रशासक कारकीर्द संपल्यानंतर या बाजार समितीचा कारभार पाहण्यासाठी आघाडी शासनाकडून शासननियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊन युतीचे सरकार आल्याने या बाजार समितीवर नवीन शासनाचे शासननियुक्त संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या विरोधात सत्ताधारी संचालक मंडळानेही दावा दाखल करत बाजार समितीवर कार्यरत प्रशासकीय मंडळच असावे, असे नमूद केले होते. परिणामी चार-पाच महिने न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या बाजार समितीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून बाजार समितीवरील प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करून येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्यात याव्यात असा महत्वपूर्ण निकाल दिला होता. त्या अनुषंगाने गेल्या महिनाभरापूर्वी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्या याद्यांवर फारशा हरकती नसल्याने या याद्या कायम करण्यात आल्या. परिणामी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास क्रमप्राप्त असल्याने या बाजार समितीवर १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात सोसायटी गटातून ११ जागा आहेत. सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागास वर्गीय १, विमुक्त जाती/भटक्या जमाती १, ग्रामपंचायत गटात ४ जागा असून, सर्वसाधारण २, अनु.जाती/जमाती १, आर्थिक दुर्बल घटक १, व्यापारी गटात २ जागा असून, हमाल मापारी गटात १ जागा याप्रमाणे विवरण करण्यात आले आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी येवला येथील सहायक निबंधक जितेंद्र शेळके निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. मालेगाव येथील उपनिबंधक कार्यालयातील सहायक सहकार अधिकारी एन. डी. पाटील, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. (वार्ताहर)