शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

निवडणूक कर्मचाऱ्यांची उजळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:29 AM

निवडणूक निर्विघ्न आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मतदानाच्या आणि मतमोजणीच्या काळातील दक्षता अधिक महत्त्वाची असून, यावेळी घेण्यात येणाया नोंदी या काटेकोर घेणे अपेक्षित आहे. ईव्हीएमचे प्रशिक्षण सर्व संबंधितांना देण्यात आलेले असल्याने कोणतीही चूक होता कामा नये.

नाशिक : निवडणूक निर्विघ्न आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मतदानाच्या आणि मतमोजणीच्या काळातील दक्षता अधिक महत्त्वाची असून, यावेळी घेण्यात येणाया नोंदी या काटेकोर घेणे अपेक्षित आहे. ईव्हीएमचे प्रशिक्षण सर्व संबंधितांना देण्यात आलेले असल्याने कोणतीही चूक होता कामा नये. कायदेशीर तरतुदींचे पालनदेखील केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी केले.महाकवी कालिदास कलामंदिर येते विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने क्षेत्रीय अधिकारी, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ खर्च सनियंत्रण कामावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मांढरे बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशिया, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी कायदेशीर तरतुदी व भारत निवडणूक आयोगाचे निर्देश काळजीपूर्वक अवलोकन करून जबाबदारीने केले पाहिजे. कायद्याच्या चौकटीत काम करताना अचुकता आणि दक्षता अत्यंत महत्त्वाची आहे. कर्मचाºयांना यंत्रणेची सर्व माहिती आणि मशीनचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्मचााºयांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे.उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना त्यांच्या जबाबदाºया व करावयच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने कायदा व त्यातील निवडणूक आयोगाचे निर्देश याबाबत खर्च नियंत्रण कक्षामध्ये नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी भारत निवडणूक आयोगाचे विविध सुविधांबाबत मार्गदर्शन केले. सीजीव्हील व्यवस्थेविषयीची माहितीदेखील देण्यात आली. या सुविधांचा लाभ कसा आहे याची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेनंतर निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आभार मानले.निवडणूक कामाचा आढावाविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे निवडणूक कामाचा आढावा घेतला. निवडणूक कामासाठी लागणारे मनुष्यबळ आणि साहित्य याबाबतची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगून निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कायदे व निवडणूक विषयक बाबींचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, असे सांगितले.४पोलिसांनी संवेदनशील केंद्राची यादी तयार ठेवावी, असेही सांगितले. बैठकीत ईव्हीएम मशीन, निवडणूक खर्च, वाहनव्यवस्था, वाहतूक, सनियंत्रण, प्रमाणीकरण, कायदा व सुव्यवस्थापन प्रशिक्षण व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.४यावेळी संवेदनशील मतदानकेंद्रांची तसेच उपद्रवी घटकांची पडताळणी करून त्याबाबतची यादी तयार ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी पोलीस यंत्रणेला दिले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय