जमिनीच्या वादातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:16 IST2021-05-07T04:16:24+5:302021-05-07T04:16:24+5:30

डुबेरे शिवारातील वाजे वकिलांच्या मळ्यात हा प्रकार घडला. अशोक पुंजा वाजे, भाऊ विलास व किरण हे ट्रॅक्टर घेऊन ...

Elderly couple beaten over land dispute | जमिनीच्या वादातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

जमिनीच्या वादातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

डुबेरे शिवारातील वाजे वकिलांच्या मळ्यात हा प्रकार घडला. अशोक पुंजा वाजे, भाऊ विलास व किरण हे ट्रॅक्टर घेऊन शेतात जाण्यासाठी रस्ता बनविण्यासाठी गेले होते. त्यांनी जबरदस्तीने बाळासाहेब बाबूराव वाजे यांच्या शेतातील मका व फळझाडे तोडून रस्ता बनविण्यासाठी सुरुवात केली. ते पाहून बाळासाहेब वाजे यांनी जाब विचारला. त्यावर अशोक, विलास व किरण यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तर विलास याने छातीवर बुक्क्यांनी प्रहार केला असल्याचे बाळासाहेब वाजे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दाम्पत्याच्या तक्रारीवरून संशयित अशोक वाजे, विलास वाजे, किरण वाजे, मंजुळाबाई वाजे, उषा वाजे, भारती वाजे, पुष्पा वाजे यांच्याविरोधात गंभीर दुखापत, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, दंगा, दमदाटी करून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Elderly couple beaten over land dispute