शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

याला शिक्षणाधिकारी व वित्त अधिकारीच जबाबदार

By admin | Updated: June 24, 2014 00:26 IST

शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणालींतर्गत काढावयाचे आहेत. यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षकांची माहिती संगणकात फिड करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना

शिक्षक संघाचा आरोप : मंगळवारी घेरावगोंदिया : शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणालींतर्गत काढावयाचे आहेत. यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षकांची माहिती संगणकात फिड करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना ती माहिती देण्यात आली आहे. मात्र शिक्षणाधिकारी आणि लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या भानगडीत शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार झालेले नाहीत. शिक्षकांच्या पगारासाठी लागणारे पैसे तीन महिन्यांपूर्वीच आले आहेत. मात्र शिक्षकांचे पगार निघत नसून याला शिक्षणाधिकारी आणि लेखा व वित्त अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष आनंद पुंजे व जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे यांनी केला. शिक्षकांच्या रखडलेल्या पगाराच्या विषयाला घेऊन आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. संघाचे जिल्हा संघटक केदार गोटेफोडे, जिल्हा उपाध्यक्ष अजय चौरे, जिल्हा संयोजक प्रमुख नूतन बांगरे, जिल्हा नेते डी.टी.कावळे, तालुका संपर्क प्रमुख अयूब खान यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या पत्रपरिषदेत माहिती देताना पुंजे यांनी सांगीतले की, शासनाने आदेश तर पाठविले. मात्र शाळेत संगणक व इंटरनेट नसल्याने बाहेर इंटरनेट कॅफेवर जाऊन एका शिक्षकामागे ५० रूपये देऊन माहिती भरून गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. एवढी कसरत करूनही पगार मात्र निघालेले नाही. पगाराच्या विषयावर ३० मे रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेत सभा घेऊन चर्चा झाली असता १० दिवसांत पगार काढण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र काहीच कारवाई झाली नाही व १६ जून रोजी अध्यक्षांच्या दालनात झालेल्या सभेत दोन दिवसांत पगार काढण्याचे मुख्य लेखा वित्त अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी ठरविले होते. मात्र अद्याप एप्रिल आणि मे महिन्याचे पगार झालेले नसल्याचे सांगीतले. तर हा प्रकार अन्य जिल्ह्यांत नसून फक्त गोंदियातीलच चार हजार ५०० प्राथमिक शिक्षकांचे पगार झाले नाही. विशेष म्हणजे ७ नोव्हेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेला शालार्थ वेतन प्रणालीची पूर्वतयारी करावयाची होती. मात्र शिक्षण विभागाने लक्ष न दिल्याने विभागातील कर्मचारीही आम्हाला माहिती नाही, प्रशिक्षणही नाही त्यामुळे त्रास देऊ नका, असे उत्तर देत असल्याचे कटरे यांनी सांगितले. यामुळेच २४ जून रोजी सकाळी ११ वाजता शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य लेखा वित्त अधिकारी यांचा घेराव घालणार. तसेच २६ जून पासून शाळा सुरू झाल्यास शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीची सभा, पाठ्यपुस्तके वाटपसह कोणतेही शासकीय कार्य करणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)