निर्माल्यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप

By Admin | Updated: September 6, 2016 23:00 IST2016-09-06T23:00:00+5:302016-09-06T23:00:12+5:30

सेवादल, कॉलेज कॅम्पस : स्वच्छतेचाही दिला संदेश

Eco-friendly cloth bags for the production | निर्माल्यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप

निर्माल्यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप

नाशिक : नाशिक शहर कॉँग्रेस सेवादल व कॉलेज कॅम्पस फे्रंड सर्कलच्या वतीने गणेशोत्सवातील निर्माल्य गोळा करण्यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशव्या बनविण्यात आल्या असून, आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणाचा व स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या निमित्ताने पूर्ण होणार आहे. नाशिक शहरातील सार्वजनिक मित्रमंडळे, सोसायटी, कॉलनी परिसरात सुमारे दहा हजार निर्माल्य पिशव्यांचे वाटप करण्यात येणार असून, त्यातून पर्यावरणाला हातभार लागेल. या पिशव्यांचे वितरण आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, सेवादलाचे शहर अध्यक्ष वसंत ठाकूर, प्रदेश संघटक आर. आर. पाटील, अण्णा पाटील, उद्धव पवार, सुरेश मारू, बबलू खैरे, मुन्ना ठाकूर, आकाश घोलप, दत्ता कासार, सचिन जाधव, गौरव पवार, कमलेश येवले, अण्णा मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Eco-friendly cloth bags for the production