दत्तू भोकनळ यांचा पाटोद्यात सत्कार

By Admin | Updated: September 4, 2016 00:01 IST2016-09-03T23:50:37+5:302016-09-04T00:01:34+5:30

दत्तू भोकनळ यांचा पाटोद्यात सत्कार

Duttu Bhokanal felicitated in Patoda | दत्तू भोकनळ यांचा पाटोद्यात सत्कार

दत्तू भोकनळ यांचा पाटोद्यात सत्कार


पाटोदा : रियो आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू दत्तू भोकनळ यांचा संत मुरलीधरबाबा पतसंस्था कातरणी ता. येवला शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे शाखधिकारी दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते दत्तू भोकनळ यांचा रोख रु पये पाच हजार देऊन सत्कार करण्यात आला. भविष्यात जपानमधील टोकियो शहरात होणाऱ्या स्पर्धेत आपण सहभागी होणार असून, स्पर्धेसाठी आवश्यक असणारी तयारी मी करीत असल्याची माहिती दत्तू भोकनळ यांनी उपस्थितांना दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन धोंडिरामजी कुऱ्हाडे, पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रयत्नातून आॅलिम्पिक स्पर्धेत मला पदक मिळविता आले नसले तरी भारतीयांसाठी भविष्यात निश्चितच पदक मी मिळविणारच असा ठाम विश्वास उपस्थितांना दिला. सत्कारप्रसंगी संजूभाऊ कुऱ्हाडे, शिवाजी पाटील, बापूसाहेब सोनवणे, अनिल शिनकर, अशोक बंदरे, नितीन आहेर, योगेश कदम आदि उपस्थित होते.

Web Title: Duttu Bhokanal felicitated in Patoda