चिमुकल्यांनी बनविले टाकाऊतून टिकाऊ

By Admin | Updated: September 5, 2014 00:32 IST2014-09-04T22:02:00+5:302014-09-05T00:32:49+5:30

चिमुकल्यांनी बनविले टाकाऊतून टिकाऊ

Durable from the turbines made by sparrows | चिमुकल्यांनी बनविले टाकाऊतून टिकाऊ

चिमुकल्यांनी बनविले टाकाऊतून टिकाऊ



सिन्नर : येथील संजीवनीनगर भागातील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी टाकाऊ वस्तूंपासून विविध आकर्षक टिकाऊ वस्तू बनविल्या. विद्यार्थ्यांच्या किमयागार हातातून आकारलेल्या वस्तू नजरेत भरणाऱ्या ठरल्या.
शाळेतील कलाशिक्षक प्रीती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आकाराच्या गणेशमूर्तींसह बहुपयोगी वस्तू बनविण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवनिर्मितीचा
आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यशाळेत मुख्याध्यापक श्रीमती सुरेखा जेजूरकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्तीमुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांची माहिती सांगतानाच मानवी आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी इको-फ्रेंडली गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना जलप्रदूषण रोखण्याचे आवाहन केले.
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याच्या कार्यशाळेत सुमारे १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रारंभी रिकाम्या बिनकामाच्या पुठ्ठ्याच्या खोक्यांना विविध आकार देऊन वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनविण्याचे शिकविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी घरातील टाकून देण्यासारख्या वस्तूंपासून घरात शोभिवंत वस्तू बनवू शकतील हा या कार्यशाळेचा उद्देश होता. घरात अनेक टाकाऊ वस्तू अडगळीत फेकून दिलेल्या असतात. बिनकामाच्या वस्तूंना भौमित्तिक आकार देऊन शोभेसाठी कुंदन, चमकी, रंग यांचा वापर करून आकर्षक वस्तू बनविण्यात आल्या. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पंकज शिंदे, अनिता चव्हाण, लक्ष्मण
रेवगडे, मीनाक्षी बकरे, योगेश
वैष्णव, शंकर बेणके, सविता सावंत, वैशाली गुरुळे आदिंसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Durable from the turbines made by sparrows