शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

‘जलयुक्त’मुळे ढेकू शिवार झाले जलमय; रब्बीच्याही आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 5:59 PM

नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाºयाच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकून गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनाही जलसंधारणाचे महत्त्व ध्यानी आले आहे.

ठळक मुद्देनांदगावातील ढेकू झाले जलमय १९ लाख रुपये खर्चून जलयुक्तची विविध कामे श्रमदानातून जलायशयातीला गाळाचा उपसा

नाशिक : नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाºयाच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकून गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनाही जलसंधारणाचे महत्त्व ध्यानी आले आहे. नांदगाव तालुक्यातील ढेकू बुद्रूक आणि ढेकू खुर्द अशा दोन्ही गावांत पाणीटंचाई असल्याने उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. विहिरीची पाणीपातळी जानेवारीनंतर खालवत असल्याने त्यानंतर पिके घेणे कठीण होत असे. परंतु ‘जलयुक्त शिवार’ योजनेत गावाची निवड झाली आणि या गावाचे रूपच पालटले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन्ही गावांत विविध यंत्रणांमार्फत २८ कामे पूर्ण करण्यात आली. या कामांवर सुमारे १९ लाख रु पये खर्च करण्यात आला. गाळ काढण्याच्या कामात लोकसहभागही चांगला मिळाला. एकूण दोनशे हेक्टर क्षेत्रावर कामे घेण्यात आली. ढेकू बुद्रूक गावाची पाण्याची एकूण गरज ३३३ टीसीएम असताना पाणीसाठा २२४ टीसीएम होता. नव्या कामांमुळे २०५ टीसीएम अतिरिक्त पाणीक्षमता निर्माण झाल्याने पाऊस चांगला आल्यास रब्बीच्या पिकांसाठीदेखील पाणी उपलब्ध होणार आहे. ढेकू खुर्द गावात पाण्याची गरज ४२० टीसीएम असताना जलयुक्तच्या कामांमुळे एकूण ४२८ टीसीएम पाणीक्षमता निर्माण झाली आहे. दोन्ही गावांत आॅगस्ट महिन्यातील चांगल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. तयार करण्यात आलेल्या मातीला बांध व गॅबिअन बंधाºयामुळे पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर क्षेत्र उपचारामुळे भूजल पातळीतही वाढ झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारNashikनाशिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी