शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्ते पुन्हा खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:37 IST

शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळ्यात महामार्ग, अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भागांत ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे.

नाशिक : शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळ्यात महामार्ग, अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भागांत ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. महापालिकेकडून असे खड्डे बुजविण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक भागात खड्डे जैसे थे असल्याचे दिसत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असूनदेखील महापालिका प्रशासन याबाबत सुन्न झाल्याचे दिसत आहे.पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्ड्यांच्या प्रमाणात हमखास वाढ होत असते. त्यामुळे पावसाळा व खड्डे यांचे नाते घट्टच असल्याचे दिसते; मात्र महापालिकेकडून अनेक प्रयत्न करूनदेखील हे खड्ड्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे. शहरातील रिंगरोड असो की कॉलनीरोड अशा सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे सध्या बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने शहरातील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला; मात्र खड्ड्यांमध्ये टाकलेल्या कचमुळे वेगळाच त्रास सहन करावा लागला. तसेच काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा जैसे थे झाल्याचे दिसून आले. शहरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील सर्वच भागांत खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालिकेने यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्यनाशिक-पुणे महामार्गावर सतत झालेल्या पावसामुळे पुन्हा खड्डेच खड्डे झालेले बघावयास मिळत आहेत. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांत पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे बघायला मिळाले होते. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत होते. यानंतर पालिकेकडून या खड्ड्यांमध्ये मुरूम माती टाकण्यात आली, तर काही ठिकाणी डांबर पण खूप प्रमाणात टाकल्याचे दिसत आहे. सतत झालेल्या पावसामुळे शहरात पुन्हा खड्डे तयार झाल्याचे चित्र बघावयास मिळत होते. त्यात नाशिकरोड ते द्वारका महामार्र्गावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाल्याचे दिसत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने वाहनचालक तसेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.डागडुजीचे काम निकृष्टपावसामुळे खड्डे तयार होण्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी पालिक ा असे खड्डे बुजविण्यासाठी देखावा करीत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणाºया शास्त्रशुद्ध पद्धतीचा अभाव खड्डे बुजविताना दिसत आहे. खड्डे बुजवित असताना महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी नसल्यामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे ते खड्डे बुजविताना डागडुजीचा मुलामा लावत आहे.महिनाभरातच रस्त्यांची दुरवस्थाशहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आल्यानंतरही पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. राष्टÑपतींच्या नाशिक दौºयादरम्यान ओझर ते नाशिक-पुणे महामार्ग चकाचक करण्यात आला होता; परंतु महिनाभराच्या कालावधीनंतर पुन्हा या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस