शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित कायद्याच्या विरोधात धरणे

By admin | Updated: February 12, 2015 00:48 IST

प्रस्तावित कायद्याच्या विरोधात धरणे

नाशिक : केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन वाहतूक कायद्यातून एस.टी. महामंडळास जाचक ठरू पाहणाऱ्या तरतुदी वगळण्यात याव्यात, या मागणीसाठी बुधवारी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. इंटकचे राज्य अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकार रस्ते वाहतूक व सुरक्षित कायदा आणू पाहात असून, त्यात एस. टी. महामंडळास जाचक अशा अटी व शर्ती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या प्रचलित मोटार वाहन कायदा १९८८ कलम ९९ ते १०४ नवीन विधेयकामध्ये वगळण्यात आले आहे. त्यामुळे एस. टी. सारख्या सार्वजनिक संस्थांना देण्यात आलेली प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते, त्याचबरोबर गाव पातळीवर प्रवासी वाहतुकीची व्यवस्था निर्माण होऊन खासगी कंपन्या उभ्या राहतील. ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असेल त्या मार्गाचा ठेका खासगी कंपन्या घेतील व ज्या मार्गावर प्रवासी नाहीत, तेथे एस.टी. ला प्रवासी वाहतूक करावी लागेल. परिणामी एस.टी. महामंडळ तोट्यात येईल व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन देशोधडीला लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित कायद्यातून जाचक असलेल्या अटी व शर्ती वगळण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात योगिता अहेर, समिना मेमन, आकाश छाजेड, परवेज मेमन, सुनील आव्हाड, गोरख खोकले, अशोक जाधव, विजय गायकवाड, रमेश इप्पर, दिलीप सूर्यवंशी आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)