शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपेक्षा मतदान यंत्रे डोईजड

By admin | Updated: March 25, 2015 01:35 IST

निवडणुकीपेक्षा मतदान यंत्रे डोईजड

देवळाली कॅम्प : निवडणुकीनंतर सहा महिने मतदान यंत्रे आहे त्याच स्थितीत ठेवावी लागतात असा नियम असल्याने छावणी परिषदेच्या ताब्यात असलेल्या यंत्रांच्या संरक्षणासाठी येणारा खर्च परिषदेला डोईजड झाला आहे. शिवाय एका वॉर्डाच्या निकालाबाबतचा पेचही न्यायालयात असल्याने या मशीन जवळच ठेवणे क्रमप्राप्त ठरले आहे. छावणी परिषदेच्या आठ वॉर्डांच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून गेल्या ६ जानेवारी रोजी ५२ मतदान यंत्रे (इव्हीएम) छावणी परिषदेकडे देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४३ यंत्रे वापरण्यात आले. ११ जानेवारी रोजी मतदान व १२ जानेवारी २०१४ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. त्यानंतर मतदान यंत्रे ही छावणी परिषदेच्या कार्यालयातील उपाध्यक्षांच्या कक्षामध्ये ठेवण्यात आली आहेत. छावणी प्रशासनाकडून जिल्हा निवडणूक शाखेला मतदान यंत्रे घेऊन जाण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक नियमाकडे बोट दाखविल्याने छावणी प्रशासनाने दिल्लीच्या निवडणूक आयोग कार्यालयाकडून नियमावली मागवली होती. मात्र तेथूनही तेच उत्तर आले.निवडणूक झाल्यापासून मतदान यंत्रे बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाकडून २४ तास दोन बंदुकधारी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी दर दिवशी १७ हजार रुपयाची आकारणी करण्यात येणार असल्याचे पत्र पोलिसांनी छावणी परिषदेला दिलेले आहे. निवडणुकासाठी झालेल्या खर्चापेक्षा मतदान यंत्रे सांभाळण्याचा खर्च परिषदेला डोईजड झाला असून, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. (वार्ताहर)