चांदवड शहरात आजाराचे थैमान

By Admin | Updated: August 24, 2016 22:16 IST2016-08-24T22:15:57+5:302016-08-24T22:16:43+5:30

रुग्णसंख्येत वाढ : डेंग्यू,मलेरियाचा फैलाव

Due to illness in Chandwad city | चांदवड शहरात आजाराचे थैमान

चांदवड शहरात आजाराचे थैमान

चांदवड : शहरात पुन्हा डेंग्यू, मलेरिया व थंडीतापाच्या आजाराने थैमान घातले असून, गेल्या दोन महिन्यांपूर्वी वरचे गाव परिसरात या
रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने तेथील रुग्ण नाशिक, पिंपळगाव व विविध रुग्णालयात भरती झाले होते.
आता या रोगाची लागण श्रीरामरोड, सोमवार पेठ, गुजराथी गल्ली आदि परिसरात पसरली असून, या भागातील असंख्य रुग्ण चांदवड, नाशिक, पिंपळगाव, मनमाड येथे औषधोपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर परिषद व उसवाड आरोग्य केंद्राच्या वतीने विशेष दखल घेऊन या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
आरोग्य विभागाने येथील तलावात गप्पी मासे सोडले आहेत. सर्वत्र लक्ष देण्याचे काम सुरू असले तरी घराघरांत या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. या आजारांची मोठी साथ परिसरात आल्याने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to illness in Chandwad city