शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीच्या महापुराइतकीच भीषण ठरते पूररेषा

By admin | Updated: February 7, 2017 00:14 IST

बाधित मिळकती : सर्वसमावेशक तोडगा काढण्याची गरज

नाशिक : शहरात २००८ मध्ये आलेल्या पूररेषेने गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकविला. त्यानंतर आजपर्यंत अनेकदा पुरामुळे मिळकती बाधित होत असल्या तरी २००९ मध्ये आखलेली पूररेषा भयंकर ठरत आहे. आता गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी जी पूररेषा आखण्याचा प्रस्ताव आहे, त्यामुळे शेकडो मिळकती बाधित होणार आहेत. त्यामुळे पूररेषा आखण्यात केवळ तांत्रिक बाजू न सांभाळता सर्वसमावेशक तोडगा काढण्याची गरज आहे.नााशिक शहरात गोदावरी, नासर्डी, वाघाडी आणि वालदेवी या चार प्रमुख नद्या आहेत. त्यापैकी गोदावरी आणि नासर्डी नदीचा रुद्रावतार धोकादायक असतो. नाशिक शहराचा इतिहास बघितला तर यापूर्वी ९ सप्टेंबर १९६९ मध्ये गोदावरी नदीला सर्वाधिक मोठा महापूर आला होता, असे सांगितले जात होते. त्यानंतर दर पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर येत असला तरी त्याची तीव्रता तितकीशी भीषण नव्हती. २००५ मध्ये मुंबईत मिठी नदीला महापूर आल्यानंतर राज्यातील सर्वच नद्यांच्या काठावर असलेले अतिक्रमण तसेच संकुचित झालेले नदीपात्र याची चर्चा झाली. त्यावेळीच नाशिक शहराची पूररेषा आखावी, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर २००८ मध्ये गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे ही गरज अधिक अधोरेखित झाली. त्याचे कारण म्हणजे नाशिक महापालिकेच्या पहिल्या विकास आराखड्यात पूररेषा प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र नंतर मंजूर होताना गायब झाली. त्यामुळे महापालिका स्थापन झाल्यानंतर पूररेषाच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिकेने पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून पूररेषा आखून घेतली. त्यावर पन्नास लाख रुपये खर्च झाले. परंतु आता नाशिक शहरातील गोदावरीसह अन्य नद्यांची पूररेषा अडचणीची ठरली आहे. पूररेषा आखल्यानंतर महापालिकेने ज्या मिळकतींवर बांधकामांच्या परवानग्या देण्यात आल्या, त्या रद्द करण्यात आल्या आणि बांधकाम पूर्ण झालेल्या ठिकाणी पूर्णत्वाचे दाखले देण्यात आले नाही. हा घोळ अनेक वर्षे चालल्यानंतर महापालिकेने ज्या मिळकतींना परवानगी दिली, त्या मिळकतधारकांना स्वत:च्या जबाबदारीवर राहण्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे ठरले, त्यानुसार सध्या तयारी सुरू आहे. तथापि, अन्य अनेक मिळकती डेड इन्व्हेंसमेट ठरल्या आहेत. नाशिक महापालिकेचा हा पूररेषेचा प्रश्न सुटलेला नाही, अशातच आता गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी निरी या संस्थेने नवीनच ‘लक्ष्मणरेषा’ आखली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रापासून विशिष्ट क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम दूरच, परंतु जॉगिंग ट्रॅकही प्रतिबंधीत करावा, असे नियोजन आहे. निरीचा हा विषय सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु या विषयाचे धोके लक्षात घेता, उच्च न्यायालयानेच विभागीय आयुक्तांना सुचविल्यानुसार एक उपसमिती गठित करण्यात आली आहे.  या समितीच्या शिफारशी उच्च न्यायालयाला सादर करण्यात आल्या आहेत. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, न्यायालयाने निरीचे  म्हणणे मान्य केल्यास महापालिकेच्या प्रस्तावित शहर विकास आराखड्यात तशी तरतूद करण्यात येणार आहे. अशावेळी या नव्या पूररेषेत बाधित मिळकती आणि रहिवाशांचे काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण होणार   आहे. (प्रतिनिधी)साडेतीन हजार मिळकती बाधितमहापालिकेने पाटबंधारे खात्याकडून विविध नद्यांची पूररेषा आखून घेतली. त्यावेळी पूररेषेत तब्बल साडेतीन हजार मिळकती बाधित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील अनेक मिळकती गावठाण भागातील असून, त्या कवडीमोल दराने विकल्या गेल्या आहेत. सर्वच मिळकती विकासकांच्या नाहीत, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरादारांचे काय होणार, हा प्रश्न आहे. नासर्डी नदीलगत एका व्यापारी संकुलाला महापालिकेने पूररेषेच्या नावाखाली पूर्णत्वाचा दाखला देण्यास नकार दिला, परंतु संबंधितानी उच्च न्यायालयात लढाई करून महापालिकेला पूर्णत्वाचा दाखला देण्यास भाग पाडले. परंतु सर्वच मिळकतदार न्यायालयात जाऊन निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे महापालिकेने त्याचा योग्य विचार करणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे....या उपाययोजनांचे  काय झाले?नाशिक महापालिकेच्या पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानुसार नदी प्रवाहाला अवरोध करणारे पूल हटविणे, होळकर पुलाखालील बंधारा हटविणे अशा कामांचा समावेश होता, परंतु त्यानुसार कार्यवाही झाली नाही. नदीपात्रातील गाळ काढून खोली वाढविण्यासाठी शासनाने यंत्रसामग्री देण्याची मदत देऊ केली होती. त्यावेळी अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी ही मदत देऊ केली होती, परंतु महापालिकेने त्याचा उपयोग करून घेतला नाही.