शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात रंगू लागले निवडणुकीच्या गप्पांचे फड

By admin | Updated: October 13, 2014 00:48 IST

गावागावात रंगू लागले निवडणुकीच्या गप्पांचे फड

 

सिन्नर : विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. मतदानासाठी शासकीय यंत्रना सज्ज झाली असून, उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या भोंग्यांनी गावे ढवळून निघाली असून, तालुक्यातील गावागावात केवळ निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगू लागले असल्याचे चित्र आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिके काढणीस तयार होऊ लागली आहे. अद्याप पिकांच्या काढणीस कालावधी असून, पिके निघाल्यावर रब्बी हंगामाची कामे सुरु होणार आहे. खरीप हंगाम उरकण्याच्या व रब्बी हंगाम सुरु होण्याच्या कालावधीतच निवडूक आल्याने शेतकऱ्यांना मोकळा वेळ मिळू लागला आहे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या विचारांचे, पक्षांचे व नेत्यांचे कार्यकर्ते हमखास दिसतात. त्यांनी आपापल्या नेत्यांचा प्रचार करताना आपलाच नेता कसा श्रेष्ठ असून तो कसा निवडूण येणार आहे याचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली असून, नेत्यांचे मार्केटिंग केले जात असल्याने याच एकमेव चर्चेवर गावागावतील पारांवर चर्चांना उत आला आहे. ग्रामपंचायत, विकास संस्थांच्या निवडणुकीपासून थेट लोकसभेच्या निवडणुकीतही गावगाड्यातील अठरापगड जातींच्या मतदारांवर सर्वच पक्षांचे व उमेदवारांचे लक्ष केंद्रित होत असते. त्यांचा विकास कसा केला अथवा कसे कल्याण केले जाणार आहे याबाबत पटवून दिले जाते. आपलाच उमेदवार चांगला असून, तोच निवडून येणार असल्याच्या चर्चेत गावात अनेकदा वादाचे व हमरीतुमरीचे प्रसंगी ओढवेले जाते. आपल्याला एकाच गावात रहायचे आहे कोणीही निवडून गेले तरी आपल्याला काही फरक पडणार आहे का, गड्या आपले काम आपणच केले तरच भाकर मिळणार आहे, असे म्हणून ज्येष्ठ वाद सोडवतात, प्रचाराच्या गाड्यांतून देण्यात येणाऱ्या घोषणा, भोंग्यांवर वाजवणारी गाणी, दाखविण्यात येणाऱ्या चित्रफिती यातून लहानथोरांची करमणूक होत आहे. गावांतील पारांवर रंगणाऱ्या गप्पा गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत जात असून, घरोघरी आता दूरचित्रवाणी संच झाल्याने देशासह जगातील घडामोडींची माहिती घरात बसून मिळू लागल्याने त्यावरही चर्चा झडत असतात. (वार्ताहर)