चांदवड महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा संपन्न

By Admin | Updated: September 29, 2014 00:00 IST2014-09-28T23:59:49+5:302014-09-29T00:00:10+5:30

चांदवड महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा संपन्न

Done the research workshop at Chandwad College | चांदवड महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा संपन्न

चांदवड महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा संपन्न

चांदवड : येथील आबड, लोढा, व जैन वरिष्ठ महाविद्यालयात राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धच्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन हे होते. नाशिक जिल्ह्यातील ३०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे ओ.एस.डी. डॉ. रवींद्र जायभावे यांच्या हस्ते करण्यात आले. अविष्कार संशोधन स्पर्धेचे स्वरुप व मूल्यमापनपद्धती या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतात पुणे विद्यापीठाने अविष्कार स्पर्धेमध्ये मिळविलेल्या यशाचा आढावा घेतला. संशोधन लोकोपयोगी व विज्ञाननिष्ठ असावे. अशा संशोधनाला विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल. अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी भरीव शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
भिगवण महाविद्यालयातील डॉ. भटकल भास्कर यांनी संप्रेषण कौशल्ये याविषयावर मार्गदर्शन केले. पुणे येथील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी प्रकल्प लेखन व सादरीकरण या विषयावर व्याख्यान दिले. (वार्ताहर)

Web Title: Done the research workshop at Chandwad College