टोल कर्मचाऱ्यांकडून डॉक्टरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 10:14 PM2019-09-03T22:14:42+5:302019-09-03T22:15:02+5:30

मनमाड : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिली चित्रफीत मनमाड : येथील प्रथितयश डॉक्टर चांदवड येथील टोल नाक्यावर बराच वेळ गाडी लेनमध्ये उभी केल्याची तक्रार नोंदविण्यासाठी टोल कार्यालयात गेले असता त्यांना नाका कर्मचाºयांकडून शिविगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. टोल नाक्यावरील कर्मचाºयांची दादागिरी अधोरेखित करणारी व्हिडीओ चित्रफीत व लेखी तक्रार त्यांनी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकाºयांकडे दिली आहे.

Doctor beaten up by toll staff | टोल कर्मचाऱ्यांकडून डॉक्टरला मारहाण

टोल कर्मचाऱ्यांकडून डॉक्टरला मारहाण

Next
ठळक मुद्देकर्मचाºयांनी तक्रार नोंदवून न घेता शिविगाळ करून मारहाण केल्याचे डॉ. गुजराथी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मनमाड : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिली चित्रफीत मनमाड : येथील प्रथितयश डॉक्टर चांदवड येथील टोल नाक्यावर बराच वेळ गाडी लेनमध्ये उभी केल्याची तक्रार नोंदविण्यासाठी टोल कार्यालयात गेले असता त्यांना नाका कर्मचाºयांकडून शिविगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. टोल नाक्यावरील कर्मचाºयांची दादागिरी अधोरेखित करणारी व्हिडीओ चित्रफीत व लेखी तक्रार त्यांनी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकाºयांकडे दिली आहे.
मनमाड येथील डॉ. अमोल प्रताप गुजराथी हे आपल्या नातेवाइकांच्या दशक्रिया विधिसाठी कुटुंबासह नाशिक येथे गेले होते. परतीच्या प्रवासात चांदवड येथील टोल नाक्यावर केबिनमध्ये कर्मचारी उपस्थित नसल्याने लेनमध्ये बराच वेळ गाडी उभी राहिल्याने त्याची तक्रार नोंदवून पोहोच घेण्यासाठी ते टोल कार्यालयात गेले.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाºयांनी तक्रार नोंदवून न घेता शिविगाळ करून मारहाण केल्याचे डॉ. गुजराथी यांनी तक्रारीत म्हटले आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी गुजराथी यांनी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकाºयांकडे याबाबत तक्रार दिली आहे.
दरम्यान, टोल नाक्यावरील कर्मचाºयांच्या या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Doctor beaten up by toll staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.