विद्यार्थ्यांना शिक्षा करू नका, नाशकात मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 15:44 IST2018-02-10T15:25:56+5:302018-02-10T15:44:47+5:30

विद्यार्थ्यांना शिक्षा करू नका, नाशकात मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाचे पत्र
नाशिक : नाशिकरोड उपनगर परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थार्ंना झोलेल्या माराहान प्रकरणाची शिक्षण विभागाने गांभिर्याने दखल घेतली असून शिक्षण अधिकआऱ्यांना शिक्षण हक्क कायद्याची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई-2009) नुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकरारची शारीरीक, मानसिक, शिक्षा देण्यास मनाई आहे. असे असताना एमराल्ड शाळेतील विद्यार्थ्यांना गंभीर मारहान केल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला होता. या प्रकरणानंतर संबंधित शाळेची मान्यता तत्काळ रद्द करण्याची शिफारस मनपा शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे करण्यात आली होती. शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे मनमानी कारभार करून विद्यार्थी व पालकांचा आर्थिक व मानसिक छळ करणार्या शिक्षण संस्थांना दणका बसला असतानाच शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा करून नये असे पत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. या आदेशाची महापालिकेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासणी तत्काळ अंमल बजावणी केली असून नाशिक महापालिकेच्या शाळांसह शहरातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना या पत्राची प्रत पाठवून शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारिरीक अथवा मानसिक शिक्षा देण्यास मनाई असल्याचे सूचित केले आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शारिरीक शिक्षा केली जात असल्याचे निदर्शनास येत असून अशाप्रकारच्या घटनांना आवर घालण्यासाठी शिक्षणाधिकारी स्तरावरून दक्षता पथक स्थापन करून शिक्षक व पालकांची बैठक घेऊन याविषयी जनजागृती करण्याचे आवाहनही शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केले आहे.