शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजन, जनजागृतीतून सोशल मीडियावर दिवाळी

By admin | Updated: November 11, 2015 23:11 IST

शुभेच्छांचा वर्षाव : फेसबुकवर खास ‘दिवाळी मूड’

नाशिक : व्हॉट्स अप, फेसबुक, हाइक, वुई चॅट आदि सोशल मीडियावर दिवाळीचा उत्साह जाणवत असून, मेसेजिंग, इ-ग्रीटिंग्ज, अ‍ॅनिमेटेड ग्रीटिंग्ज व व्हिडीओजमधून शुभेच्छा आप्तेष्टांपर्यंत पोचवल्या जात आहेत. फेसबुक, ट्विटरवर औपचारिक शुभेच्छा दिल्या जात असल्या तरी, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर खास ‘दिवाळी मूड’ची आणि खरेदीची छायाचित्रे, रांगोळ्या-नक्षांची छायाचित्रे शेअर केली जात आहे. मनोरंजन व प्रबोधन असे दोन्हीही हेतू साध्य करत सोशल मीडियावर यंदाची दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर अनौपचारिक व विनोदी पद्धतीने शुभेच्छाही दिल्या जात आहेत. कोणी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे का?... अहो जरा लाइटच्या माळा लावायच्या होत्या घरी..!, ‘कोणी सिव्हिल इंजिनिअर आहे का?... किल्ला बांधून द्यायचा होता मुलांना! तसेच कोणी शास्त्रज्ज्ञ आहे का हो ग्रुपमध्ये?... रॉकेट पाहिजे होते जरा उडवायला !’ अशा पद्धतीचे विनोद ग्रुपवर झळकत होते. तसेच ग्रुप अ‍ॅडमिनला दिवाळी बक्षीस मागणाऱ्या पोस्ट्स फिरत होत्या. ‘देख अ‍ॅडमिन दिवाली का गिफ्ट घर पहुंचा देना, दोस्ती अपनी जगह है और गिफ्ट अपनी जगह...’ तर अ‍ॅडमिन साहेबांकडून बोनस मिळाला नाही, बोनस लवकर खात्यात जमा करा’ अशा सज्जड दम भरणाऱ्या पोस्ट्सही ग्रुपवर फिरत होत्या. त्याचबरोबर वसूबारसपासून ते भाऊबीजपर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे धार्मिक महत्त्व विशद करणारे पोस्ट्सही एकमेकांना शेअर केले जात होते. (प्रतिनिधी)