जिल्हा व सत्र न्यायालय : गॅँग रेप प्रकरणी तिघांना वीस वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:59 PM2018-05-17T22:59:27+5:302018-05-17T22:59:27+5:30

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी परिसरात एका २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते.

District and Sessions Court: Three years of forced bail for gang rape | जिल्हा व सत्र न्यायालय : गॅँग रेप प्रकरणी तिघांना वीस वर्षांची सक्तमजुरी

जिल्हा व सत्र न्यायालय : गॅँग रेप प्रकरणी तिघांना वीस वर्षांची सक्तमजुरी

Next
ठळक मुद्दे तिघांना जन्मठेप प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा प्रियकराला जिवे ठार मारण्याची धमकी

नाशिक : एका धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलाला अडवून प्रियकरास बेदम मारहाण करत त्याच्या प्रेयसीवर शेतामध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना रोकडोबावाडी परिसरात चार वर्षांपूर्वी घडली होती. या गुन्ह्यातील एकू ण सहा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली. बलात्कारप्रकरणी दोषी आढळलेल्या तिघांना वीस वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंड, तर मारहाण करणाऱ्या तिघांना सहा महिने कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी परिसरात एका २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी तत्कालीन महिला उपनिरीक्षक मीना एस. बकाल यांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करत न्यायालयापुढे हजर केले होते. उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कार, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. संशयितांनी केलेल्या गुन्ह्याचे सबळ पुरावे बकाल यांनी न्यायालयाला दिले. दरम्यान, या गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू असताना गुरुवारी (दि.१७) जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी साक्षीदारांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जग्गू प्रदीप वानखेडे, केरू ऊर्फ प्रमोद सीताराम गरुड, तुषार ऊर्फ खुशा भगवान भदरंगे या तिघा नराधमांना (सर्व रा. रोकडोबावाडी) न्यायालयाने दोषी धरले. तिघांना जन्मठेप प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दरम्यान, मारहाण करणाºया विजय उगले, कैलास बाराहाते, अनिल सदाशिव, दीपक ढोके या आरोपींना सहा महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. गायत्री पटणाला, पंकज चंद्रकोर यांनी युक्तिवाद केला.

प्रियकराला जिवे ठार मारण्याची धमकी
प्रेमीयुगुल धार्मिक स्थळी दर्शन घेऊन दुचाकीकडे येत असताना जवळच्या दुसºया मंदिराजवळ पुन्हा दर्शनासाठी वळले असताना शेतामध्ये सहा जणांचे टोळक्याने त्यांना गाठले. प्रियकरास बेदम मारहाण करीत त्याच्या प्रेयसीलाही मारहाण करीत प्रियकराला जागीच ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली. यावेळी तिघा नराधमांनी एकापाठोपाठ पीडित युवतीवर बलात्कार केल्याची फिर्याद तिने उपनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाºयांना महिला शांतता समिती सदस्यांच्या समक्ष दिली होती.

Web Title: District and Sessions Court: Three years of forced bail for gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.